शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात डॉ. सुरेखा बरलोटा ठार, तिघे जखमी; हैदराबाद येथून परत येत असतानाची घटना

By सुरेंद्र राऊत | Updated: November 1, 2022 18:48 IST

दिवाळीच्या सुटीत दुबई येथे गेलेले डॉक्टर दाम्पत्याच्या कारला तेलंगणातील निर्मलजवळ भीषण अपघात झाला.

यवतमाळ :

दिवाळीच्या सुटीत दुबई येथे गेलेले डॉक्टर दाम्पत्याच्या कारला तेलंगणातील निर्मलजवळ भीषण अपघात झाला. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी आहेत. त्यांच्यावर निर्मल येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. अपघाताचे वृत्त कळताच यवतमाळातील वैद्यकीय क्षेत्राला जबर धक्का बसला.

डॉ. पीयूष बरलोटा, डॉ. संतोष बोडखे, डॉ. मिनल काळे असे तीन कुटुंब यवतमाळातून २५ ऑक्टोबरला दुबई जाण्यासाठी हैदराबाद येथे पोहोचले. दुबईवरून ते मंगळवारी हैदराबादला परत आले. तेथून यवतमाळकडे येत असताना निर्मल जिल्ह्यातील सोन या गावाजवळ डॉ. पीयूष बरलोटा यांची कार एमएच-२९-बीपी-४२०० ही अनियंत्रित झाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर ही कार धडकली. यात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये सोबत असलेल्या डॉ. मिनल काळे, अनिता बोडखे व इतर दोन मुले जखमी झाले. जखमींना तातडीने निर्मल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

डॉ. पीयूष बरलोटा यांच्या पत्नी डॉ. सुरेखा, मुलगा पार्श व मुलगी पूजा आणि डॉ. संतोष बोडखे, त्यांची पत्नी अनिता व मुलगा, डॉ. मिनल काळे व त्यांचे कुटुंब असे तीन कुटुंब दुबई टूरसाठी गेले होते. हैदराबादवरून परत येत असताना हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार पूर्णत: चकनाचूर झाली आहे.चौकट...

ताशी १२० चा वेग भोवलाअपघातग्रस्त कार ही ताशी १२० च्या वेगात धावत होती. त्यामुळे कार चालवित असताना डॉ. बरलोटा यांना कुठलाच अंदाज आला नाही. यामुळे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर ही कार धडकली. ज्या बाजूने डॉ. सुरेखा बरलोटा बसून होत्या, तोच भाग झाडावर आदळला. बरलोटा यांना झाडाचा मार लागल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. कारमधील इतर पाच जण किरकोळ जखमी झाले, अशी माहिती निर्मल (तेलंगणा) पोलिसांकडून देण्यात आली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ