शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

वन प्रशासनाच्या नाकासमोर अवैध वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:00 IST

वन खात्याचे तमाम प्रशासन यवतमाळात बसते. मात्र या प्रशासनाच्या अगदी नाकासमोर मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात आहे. त्यानंतरही वन प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्यदक्षतेचा घाम फुटत नसल्याचे संतापजनक चित्र आहे.

ठळक मुद्देयवतमाळ वनपरिक्षेत्र : जांब रोडवर सागवान वृक्षांची कत्तल, तस्करांना मुख्यालयाचीही भीती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन खात्याचे तमाम प्रशासन यवतमाळात बसते. मात्र या प्रशासनाच्या अगदी नाकासमोर मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात आहे. त्यानंतरही वन प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्यदक्षतेचा घाम फुटत नसल्याचे संतापजनक चित्र आहे.यवतमाळपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जांब रोडवरील बहिरम टेकडीच्या मागील बाजूला अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर सोमवारी मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैधरीत्या तोड करण्यात आल्याची गंभीरबाब निदर्शनास आली आहे. जांबच्या जंगलात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वन्यप्रेमींच्या हा गंभीर प्रकार दृष्टीस पडला. या जागरुक नागरिकांनी ही वृक्षतोड व त्याबाबतची वन्यप्रेमी म्हणून वाटणारी चिंता छायाचित्रांसह ‘लोकमत’कडे मांडली. यातील अनेक झाडे अवघ्या २४ तासापूर्वी तोडली असावी असा वन्यप्रेमींचा अंदाज आहे. काल-परवापर्यंत डौलदारपणे जंगलात उभी असलेली ही परिपक्व सागवान वृक्षे रात्रीतून तस्करांनी बुडापासून कापून नेली. मशीनने नव्हे तर कुºहाडीचे घाव घालून या वृक्षांची तोड केली गेल्याचे आढळून आले.जांब रोडवरील ही वृक्षतोड प्रातिनिधीक स्वरूपात पुढे आली आहे. प्रत्यक्षात यवतमाळ वनवृत्तातील जंगल आतल्या बाजूने पूर्णत: पोखरले गेले आहेत. रस्त्याने जाताना घनदाट वृक्षे दिसत असली तरी प्रत्यक्षात थोेडे आत गेल्यास जंगलाचे मैदान झाल्याचे भयान वास्तव चहूबाजूने पहायला मिळते. परंतु या वृक्षतोडीकडे वन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एसी-कुलरमध्ये बसून काम चालविण्याच्या वरिष्ठांच्या कार्यपद्धतीचे हे फलित मानले जाते. वरिष्ठ चेंबरच्या बाहेर निघत नाहीत आणि अनेक कनिष्ठ तस्करांशी हातमिळवणी करून जंगलांचा आपल्या नजरेआड लिलाव करीत असल्याचे चित्र आहे.वन प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या यवतमाळपासून अवघ्या ‘वॉकिंग डिस्टन्स’वर एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षतोड होत असेल तर अन्य जंगलातील व दुर्मिळ, अंतर्गत भागातील जंगलांच्या सुरक्षेची कल्पनाच केलेली बरी. यवतमाळात सीसीएफ, डीएफओ, एसीएफ, आरएफओ, मोबाईल स्कॉड अशा एकापेक्षा एक वन प्रशासनातील अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. त्यांच्या अधिनस्त वनपाल, वनरक्षक, वनमजूर या सारखी यंत्रणा दिमतीला आहे. मात्र त्यानंतरही शहरी भागात अगदी रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या जंगलात अवैध वृक्षतोड होत असेल तर वन खात्याची ही यंत्रणा खरोखरच किती तत्पर आहे, हे स्पष्ट होते. जांब रोडवरील ही वृक्षतोड यवतमाळ मुख्यालयाच्या तमाम वन प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावणारी ठरली आहे. या वृक्षतोडीच्या चौकशीचे व संबंधित दोषींवरील कारवाईचे या प्रशासनापुढे आव्हान आहे. केवळ चौकशीचा बागुलबुवा उभा करून ही वृक्षतोड दडपली गेल्यास प्रशासनाचीही कुठे तरी अप्रत्यक्ष मिलीभगत तर नाही, अशा शंकेला वाव मिळू शकतो.यवतमाळचा कारभार अमरावतीवरूनयवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) राहूरकर अलिकडेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा अतिरिक्त प्रभार समकक्ष अमरावती येथील सीसीएफ चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. तेव्हापासून अमरावतीवरूनच यवतमाळ वनवृत्ताचा कारभार हाकला जातो आहे. यवतमाळच्या एसीएफचे पदही रिक्त आहे. दारव्ह्याच्या वन अधिकाऱ्याकडे हा अतिरिक्त प्रभार आहे. फिरते पथकाच्या अधिकाऱ्याचे पद तर कित्येक महिन्यांपासून रिक्तच आहे. बहुतांश जागा रिक्त असल्याने प्रभारी अधिकाºयांकडून केवळ खानापूर्ती सुरू असल्याचे सांगितले जाते. या रिक्त पदांचा जंगल व वन्य प्राण्यांच्या संरक्षणावर मोठा विपरित परिणाम होतो आहे. त्याची संधी साधून जंगलात तस्कर, शिकारी सक्रिय झाले आहेत.