शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाहतुकीचा उसळला आगडोंब

By admin | Updated: December 6, 2014 02:04 IST

वणी विधानसभा क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतुकीचा ‘आगडोंब’ उसळला आहे. पाचही पोलीस ठाण्यांतर्गत अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत आला आहे.

रवींद्र चांदेकर वणी वणी विधानसभा क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतुकीचा ‘आगडोंब’ उसळला आहे. पाचही पोलीस ठाण्यांतर्गत अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत आला आहे. मात्र स्वतंत्र वाहतूक शाखा निर्माण करूनही त्यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अपयश येत आहे. अवैध वाहतूकदार मुजोर झाल्याने अनेकदा हाणामारीच्या घटना घडत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात वणीसह मारेगाव, पाटण, मुकुटबन आणि शिरपूर ही पाच पोलीस ठाणी आहेत. वणीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. पूर्वी या पोलीस ठाण्यांतर्गतच वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात होते. मात्र दीड वर्षांपूर्वी जिल्ह्यात स्वतंत्र वाहतूक पोलीस विभाग निर्माण झाला. वणीत वाहतूक शाखा वेगळी झाली. या शाखेसाठी खास सहायक पोलीस निरीक्षकांची नेमणूक केली गेली. त्यांच्यासाठी येथे स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात आले. मात्र स्वतंत्र वाहतूक शाखा निर्माण करूनही अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.वणी शहरात ठिकठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारे आॅटो कुणाच्याही नजरेस पडतात. अगदी बसस्थानकासमोर आॅटोंची गर्दी दिसून येते. बसस्थानकासमोरच आॅटोचालक ‘चलो मारेगाव, राजूर, नांदेपेरा’ म्हणून मोठ्याने ओरडत असतात. मात्र त्यांचा आवाज कधीच वाहतूक पोलिसाला ऐकू जात नाही. बसस्थानकातून प्रवासी निघताच हे आॅटो चालक त्यांच्या पाठीमागे लागतात. प्रवासी आपल्या आॅटोत बसविण्यासाठी त्यांची चढाओढ सुरू असते. टिळक चौकात तर अवैध प्रवासी वाहतूकदारांनी अक्षरश: हैदोस मांडला आहे. तेथे अत्यंत दाटीवाटीने वाहने उभी राहतात. प्रवासी भरण्यावरून त्यांच्यात वाद होतात. वादाचे पर्यवसान हाणमारीतही होते. तरीही वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेऊन असतात. याच ठिकाणी नागपूर, वरोराकाडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सही उभ्या राहतात. त्यातही भरदिवसा प्रवासी भरले जातात. मात्र तरीही कारवाई होताना दिसत नाही. दीपक टॉकिज परिसर, बसस्थानक, टिळक चौक आदी ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने ठिय्या देऊन असतात. मात्र वाहतूक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होते. हिच परिस्थिती मारेगाव शहरातही आहे. वणीकडून यवतमाकळडे जाणाऱ्या मार्गावर एका रांगेत तेथे आॅटो उभे दिसतात. हे आॅटो रस्त्यावरच लावले जातात. त्यामुळे महामंडळाची बस थांबण्यासाठीही तेथे जागा उरत नाही. आधीच प्रवासी निवारा नसल्याने तेथे प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. त्यातच आॅटो चालक प्रवासी मिळविण्यासाठी धडपड करतात. त्यातून मारेगावात एखादवेळी मोठा अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. मारेगावचे वाहतूक पोलीस अनेकदा तेथे उभे दिसतात. मात्र ते अवैध प्रवासी वाहतुकीविरूद्ध कारवाई करताना दिसत नाही. केवळ पांढरा आणि खाकी पोशाख घालून ते बसस्थानक परिसरात मिरवितात. त्यांच्या डोळ्यादेखत आॅटोत प्रवासी कोंबले जात असताना ते मूकदर्शक बनून तेथे वावरतात. त्यामुळे पोलिसांचे अवैध प्रवासी वाहतूकदारांशी ‘साटेलोटे’, तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडतो. मुकुटबन ठाण्याअंतर्गतही अवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे. मुकुटबन ते झरी, मुकुटबन ते पाटण, मुकुटबन ते वणी या मार्गावर अनेक अवैध प्रवासी वाहने धावतात. त्यांच्यावर तुरळक प्रमाणात कारवाई होते. आता या ठाण्यात वाहतूक विभागात नवीन कर्मचारी दाखल झाले आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतदारांवर ‘वचक’ निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र हा ‘वचक’ केवळ नावापुरताच असून त्यामागे भलतेच कारण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतुकीला मात्र अद्याप ‘चाप’ लागला नाही. नवीन वाहतूक पोलीस यापूर्वी वणीतही आपली ‘कामगिरी’ बजावून गेले आहे, हे विशेष.पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतीही हिच स्थिती कायम आहे. पाटण येथून झरीजामणी, मुकुटबन, बोरीकडे दररोज प्रवासी भरून वाहने धावतात. अक्षरश: प्रवाशांना वाहनांमध्ये कोंबून नेले जाते. मात्र वाहतूक पोलिसांना त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसते. प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. पर्याय नसल्याने अनेकांना या अवैध प्रवासी वाहनांनी प्रवास करावा लागतो. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूकदारांची मुजोरी चांगलीच वाढली आहे. शिरपूर ठाण्याअंतर्गतही अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र या ठाण्याने बऱ्यापैकी त्यावर नियंत्रण ठेवले आहे. हे पोलीस ठाणे संवेदनशील आहे. अनेक कोळसा खाणी या ठाण्याच्या हद्दीत येतात. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये अनेकदा वादही घडतात. तथापि अवैध प्रवासी वाहतूकदारांमध्ये क्वचित वाद होतात.