शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वडकी परिसरात गौण खनिजाचे अवैध उत्खनन

By admin | Updated: July 14, 2017 01:48 IST

परिसरात गौण खनिजाचे अवैधरित्या बेसुमार खनन सुरू आहे. या प्रकारातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : परिसरात गौण खनिजाचे अवैधरित्या बेसुमार खनन सुरू आहे. या प्रकारातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मात्र याविषयी अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राळेगाव तालुक्यातील वडकी, किन्ही(जवादे) परिसरात गेली अनेक दिवसांपासून रेतीची अवैध तस्करी सुरू आहे. किन्ही(जवादे) येथील सर्वे नं.१०१ च्या मुरुमाची रॉयल्टी एका व्यावसायिकाने फाडली आहे. तेथून पोकलँडद्वारे मुरुमाचे खनन सुरू आहे. वास्तविक या सर्वे नंबरमध्ये पोकलँडद्वारे उत्खननाची परवानगी नाही. तरीही महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. वडकी परिसरात अनेक दिवसांपासून रेतीची तस्करी टिप्परने सुरू आहे. चार व पाच ब्रास टिप्परला परवानगी नाही. अवैधरित्या भरलेले टिप्पर खैरी, वडकी या मार्गाने भरधाव धावतात. या प्रकारात झालेल्या अपघातामध्ये अनेकांना अपंगत्व आलेले आहे. खैरी येथे झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. तरीही या प्रकारावर नियंत्रण आणले जात नाही.