शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकार अखेर पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:20 IST

यवतमाळ शहर व परिसरातील प्रमुख बडे सावकार अखेर पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. त्यांची व त्यांच्यासाठी वसुलीचे काम करणाऱ्या गुन्हेगारी सदस्यांची इत्यंभूत माहिती गोळा केली जात आहे.

ठळक मुद्देगुप्तपणे बनतेय ‘कुंडली’ : वसुलीतील गुन्हेगारी चेहऱ्यांवरही वॉच, वेगवेगळ्या व्यवसायाआड ‘व्याजाचे चक्र’

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : यवतमाळ शहर व परिसरातील प्रमुख बडे सावकार अखेर पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. त्यांची व त्यांच्यासाठी वसुलीचे काम करणाऱ्या गुन्हेगारी सदस्यांची इत्यंभूत माहिती गोळा केली जात आहे. लवकरच या संबंधी कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे.यवतमाळ शहर व परिसरात लहान-मोठे शेकडो सावकार आहेत. परंतु २५ ते ५० लाखांपासून कोट्यवधी रुपये कर्ज क्षणात उपलब्ध करून देणाऱ्या सावकारांची संख्या अवघी थोडी आहे. कुणी कापड व्यवसायाआड, कुणी हार्डवेअर, दारू, किराणा, धान्य, प्रॉपर्टी, बँकींग, सुवर्ण, हॉटेल, ट्रॅव्हल्स, बिल्डरशिप, बांधकाम कंत्राट, मेडिकल, वैद्यकीय, बॅटरी, फुटवेअर अशा वेगवेगळ्या व्यवसायाआड ही अवैध सावकारी खुलेआम सुरू आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारणे, प्रॉपर्टी लिहून घेणे, अर्ध्या किंमतीत प्रॉपर्टी पचविणे, वसुलीसाठी गुंडांचा वापर हे प्रकारही अवैध सावकारीत नित्याचे झाले आहेत. वर्षानुवर्षे व्याज देऊनही मुद्दल फिटत नाही, हे या सावकारीतील भयानक वास्तव आहे. याच मुद्दलासाठी अनेकांना जीव गमवावा लागला. जीव गेलेल्यांच्या घटनेमागे अवैध सावकारी हे कारण पुढे येताच पोलिसांचा गेल्या काही महिन्यांपासून या अवैध सावकारांवर ‘वॉच’ आहे.‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर यवतमाळातील अवैध सावकारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे हे तमाम सावकार पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. प्रमुख बड्या सावकारांची ‘कुंडली’ बनविली जात आहे. त्यातूनच ‘दहा दिवसांचे दहा टक्के व्याज’ आकारले जात असल्याचे प्रकारही पुढे आले आहेत. वर्धा येथील बिल्डर व्यवसायातील दोघांची बंगलो व फ्लॅटची योजना अशीच चार-पाच कोटी रुपयात पचल्याचेही निदर्शनास आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपला या सावकारी व बीसी व्यावसायिकांवर वॉच आहे. त्यांना हात लावण्यापूर्वी तांत्रिक अडचणीही तपासल्या जात आहे. मात्र लवकरच या प्रकरणात ठोस कारवाई झालेली दिसेल, असे एका उच्चपदस्थ जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. ‘लोकमत’च्या बातम्यांमुळेच अवैध सावकारांवरील कारवाईसाठी ‘कुंडली’ बनविण्याच्या कामाला गती आल्याचेही या अधिकाºयाने मान्य केले.नोटरी तपासा अन् पुरावे मिळवागेल्या काही वर्षात प्रॉपर्टीच्या झालेल्या नोटरी तपासल्यास खरे वास्तव पोलिसांपुढे उघड होण्यास वेळ लागणार नाही, एवढे निश्चित. कारण बहुतांश प्रॉपर्टीचे इसार पुढे सरकलेच नाही. व्यवहार फेल झाल्याचे त्यात दाखविले गेले तर ज्यांना कर्जाची रक्कम वेळेत चुकविता आली नाही, त्यांची संपत्ती अवैध सावकारांनी हडपली आहे. अशाच एका ‘हार्ड’ व्यवसायातून अलिकडेच एका वादग्रस्त संपत्तीचा ११ कोटीत व्यवहार झाला होता, हे विशेष.