शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्दू साहित्याचा दुर्मिळ व प्राचीन ठेवा दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:32 IST

उर्दू साहित्यांचा प्राचीन आणि दुर्मिळ खजाना असलेले उमरखेड येथील वाचनालय सध्या उपेक्षित असून स्थलांतरणानंतर एका कोंडवाड्यात बहुमूल्य ग्रंथसंपदा ठेवण्यात आली आहे. जीर्ण आणि जुन्या या इमारतीत ही ग्रंथसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देउमरखेडचे वाचनालय : कोंडवाड्याच्या इमारतीत ग्रंथसंपदा नष्ट होण्याची भीती

ऑनलाईन लोकमतउमरखेड : उर्दू साहित्यांचा प्राचीन आणि दुर्मिळ खजाना असलेले उमरखेड येथील वाचनालय सध्या उपेक्षित असून स्थलांतरणानंतर एका कोंडवाड्यात बहुमूल्य ग्रंथसंपदा ठेवण्यात आली आहे. जीर्ण आणि जुन्या या इमारतीत ही ग्रंथसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.उमरखेड येथे नामवंत असे मौ. मो.अली जोहर उर्दू वाचनालय आहे. या वाचनालयात उर्दू साहित्याचा मोठा ठेवा आहे. अत्यंत प्राचीन व दुर्मिळ ग्रंथ या वाचनालयात आहेत. अनेक वाचक या ठिकाणी नित्यनेमाने जावून या ज्ञानभंडाराचा उपयोग घेत होते. १९९३ पर्यंत सदर वाचनालय उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात होते. परंतु त्यानंतर उर्दू वाचनालयाचे विभाजन करण्यात आले. सदर वाचनालय आठवडीबाजारातील जनावरांच्या कोंडवाड्यात नेण्यात आले. तेव्हापासून सदर वाचनालय कोणत्याही सुविधेविना सुरू आहे. येथील जुने कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने काही दिवस वाचनालय बंद होते.वाचनालयाची ही इमारत अत्यंत जुनी आणि जीर्ण झाली आहे. ही इमारत पावसाळ्यात गळते. त्यामुळे येथील बहुमूल्य ग्रंथसाठा खराब होण्याची भीती आहे. तसेच इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक पक्ष, आघाड्या सत्तेत आल्या. नगरसेवक आलेत. विकासासाठी प्रचंड निधीही आला. परंतु वाचनालय उपेक्षितच राहिले.या उपेक्षित वाचनालयासाठी आता मुव्हमेंट आॅफ पीस अ‍ॅन्ड जस्टीस फॉर वेलफेअर संघटनेने पुढाकार घेतला आहे. नगरपरिषदेने या वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, इमारतीत वाचन कक्ष अभ्यासिकेचे नियोजन करावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.फारूक अबरार, अध्यक्ष शेख मोहसीन राज, सचिव अ.जहीर यांनी ही माहिती दिली.नगरपरिषदेच्या लौकिकाला काळीमाऔदूंबरनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरखेड शहराला साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अशा या शहरातील अत्यंत प्राचीन व दुर्मिळ ग्रंथसंपदा उपेक्षित आहे. दोन दशकांपासून ही ग्रंथसंपदा जीर्ण इमारतीत असतानाही कुणाचे लक्ष नाही, ही उमरखेड नगरपरिषदेच्या लौकिकाला काळीमा फासणारे आहे.

टॅग्स :libraryवाचनालय