शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दाभडीला जोडणारा पूल दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 21:56 IST

तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर ते गावाला जोडणारा पूल गेल्या तीन वर्षांपासून तुटलेला आहे. विशेष म्हणजे याच गावात नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता.

ठळक मुद्दे‘चाय पे चर्चा’ कोरडी : ग्रामस्थ, भाविकांना होतोय नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर ते गावाला जोडणारा पूल गेल्या तीन वर्षांपासून तुटलेला आहे. विशेष म्हणजे याच गावात नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता.दाभडी शिवार आणि ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या हा रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच रस्त्यावर हा पूल आहे. मात्र गेलया तीन वर्षांपासून तो तुटलेल्या अवस्थेत आहे. पुलाचा काही भाग पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे हा पूल जिवघेणा ठरत आहे. याच जिवघेण्या पुलावरून सध्या नागरिकांना जाणे-येणे करावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थ तथा भाविक घाबरलेले आहे.या पुलाच्या दुरुस्तीबाबत कुणीच पुढाकार घेत नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहे. याच गावात चार वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे हे गाव देशाच्या नकाशावर झळकले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या गावाला दत्तक घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निकषात बसत नसल्याने ते शक्य झाले नाही. तथापि गावाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू, निदी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन ना.अहीर यांनी मुख्यमंत्र्यांनी दाभडी गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणाही फोल ठरली.आमदार राजू तोडसाम यांनी दाभडीत विकास कामे मंजूर केली. मात्र ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ याच पद्धतीने काम सुरु आहे. गावाला, मंदिराला जोडणारा पूल महत्वाचा असताना अद्याप त्याची दुरुस्ती झाली नाही. उलट गावातील रस्ते मंजूर झाले. यामुळे ग्रामस्थ आणि भाविक वैतागून गेले आहे.हा पूल महत्वाचा आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना त्वरित पुलाच्या दुरूस्तीचे ईस्टीमेट बनवून प्रस्ताव पाठवायला सांगितले. लवकरच दुरूस्ती केली जाईल.- आमदार राजू तोडसाम

टॅग्स :Yavatmalयवतमाळ