शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

आयएफएस अभर्णा, ‘ना खाऊंगी ना खाने दुंगी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:21 IST

थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाºयाने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने

ठळक मुद्देपांढरकवडा वनविभाग : भ्रष्ट वन अधिकाºयांची ‘दुकानदारी’ बंद, लॉबिंगचा प्रयत्न, यवतमाळातून साथ

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने पांढरकवडा वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ‘दुकानदारी’च बंद झाल्याने या अधिकाऱ्यांनी आता सदर महिला अधिकाऱ्याला वेगळे पाडण्यासाठी आपली लॉबिंग सुरू केली असून त्याला यवतमाळातूनही भक्कम साथ मिळत असल्याचे सांगितले जाते.पांढरकवडा वन विभागाला के. अभर्णा यांच्या रुपाने थेट आयएफएस असलेल्या अधिकारी सलग लाभल्या आहेत. त्यांची यापूर्वीची सेवा आसाममधील देशातील सर्वात मोठ्या काझीरंगा अभयारण्यात झाली आहे. त्या तुलनेत पांढरकवड्यातील आव्हान त्यांच्यापुढे अगदीच छोटे आहे. के. अभर्णा यांनी ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या पध्दतीने पांढरकवडा वन विभागातही कामाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे वन अधिकाºयांच्या परंपरागत भ्रष्टाचाराला ब्रेक लागला आहे. दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या शिकारी, सागवानाची अवैध वृक्षतोड या सारख्या गैरप्रकारांना चाप बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी आता आपला वेगळा गट बनवून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे.पाच वर्षांपासून पांढरकवड्यात तळवन प्रशासनाची दिशाभूल करून पोलिसांना जंगल फिरविणारा एक वनअधिकारी गेल्या चार-पाच वर्षांपासून पांढरकवड्यात तळ ठोकून आहे. पुढील दोन महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. काँग्रेसच्या एका दिवंगत नेत्याशी असलेल्या नातेसंबंधाच्या बळावर या अधिकाऱ्याने गेल्या वर्षी पांढरकवड्यात मुदतवाढ मिळविली होती. आताही सत्ताधारी भाजपाच्या आर्णी व राळेगावातील आमदारांची मर्जी सांभाळून सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सेवेत राहण्याचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगितले जाते.नुकसानभरपाई धनादेश विलंबानेवाघाने हल्ला केल्याच्या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईचे धनादेश तातडीने देण्याचे आदेश आयएफएस अभर्णा यांनी दिले होते. मात्र वेगवेगळी कारणे पुढे करून तब्बल दीड महिना विलंबाने हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. त्याचे श्रेय आमदारांना मिळावे म्हणून धनादेश वाटपाचा हा कार्यक्रम कालपर्यंत लांबणीवर टाकला गेला. एरव्ही वाघाने हल्ला करूनही मृताच्या घरी भेटी देण्याची फारशी तसदी न घेणारे वरिष्ठसुद्धा गुरुवारी झालेल्या धनादेश वितरण कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. या कार्यक्रमाला आयएफएस अभर्णा मात्र अनुपस्थित होत्या.बोगस व्हाऊचर, रॉयल्टीला चापके. अभर्णा यांच्या ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या कारभारामुळे पांढरकवडा वन विभागातील भ्रष्टाचार बराच कमी झाला आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतींना, बोगस व्हाऊचरद्वारे पैसे काढण्याच्या प्रकाराला, रॉयल्टी पॅटर्नला चाप लावला आहे. त्यांनी वन खात्याला शिस्त लावली. त्या स्वत:ही दिवसा आणि रात्रीसुद्धा अचानक जंगलात गस्तीसाठी निघतात. त्यामुळे वन खात्यातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची लॉबी अस्वस्थ आहे. या लॉबीने आता आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यातून ‘आयएफएस’ला वेगळे पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे वन वर्तुळात बोलले जाते. या प्रयत्नांना यवतमाळातूनसुद्धा भक्कम साथ मिळत असल्याचीही चर्चा आहे.वाघाच्या हल्ल्याचा सुक्ष्म अभ्यासके. अभर्णा यांच्या अभ्यासपूर्ण व सूक्ष्म निरीक्षणाचा अनुभव वाघांच्या हल्ल्याच्या घटनेतून आला. पांढरकवडा विभागात वाघाने शिकार केल्याच्या आठ घटना घडल्या आहेत. त्यातील दोन घटना या के.अभर्णा उपवनसंरक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर घडल्या आहेत. या दोनही घटनांमध्ये त्यांनी मृताच्या अंगावर वाघाचे पडलेले केस, लाळ याचे नमुने घेऊन बंगलोर व हैदराबादला तपासणीसाठी पाठविले. त्या आधारे नेमक्या कोणत्या वाघाने शिकार केली, हे शोधण्यात आले. अशा पद्धतीने यापूर्वी अनेक हल्ले होऊनही कधीच सूक्ष्म तपासणीचा प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही. एवढे हल्ले होऊनही यापुर्वी वाघाला पकडण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न केले गेले नव्हते.घातपाताचा टर्न अन् पोलीस जंगलातइकडे पाठोपाठ हल्ले होत असल्याने संबंधित एका वन अधिकाºयावर बदली, निलंबन यासारखी कठोर कारवाई होऊ घातली होती. म्हणूनच की काय त्यापासून वन प्रशासनाचे लक्ष विचलित करण्यासाठी एका प्रकरणात वाघाने शिकार केलेली असताना घातपात भासविण्याचा प्रयत्न वनअधिकाºयांकडून झाला. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची एन्ट्री झाली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील संपूर्ण जंगल छानून काढले. मात्र तो घातपात नव्हे, तर वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यातील मृत्यूच असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला.