शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

यवतमाळ वनविभागातील आयएफएस अभर्णा, ‘ना खाऊंगी ना खाने दूंगी’ ;   भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 11:34 IST

थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने पांढरकवडा वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा वनविभाग भ्रष्ट वन अधिकाऱ्यांची दुकानदारी बंदलॉबिंगचा प्रयत्न, यवतमाळातून साथ

राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने पांढरकवडा वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ‘दुकानदारी’च बंद झाल्याने या अधिकाऱ्यांनी आता सदर महिला अधिकाऱ्याला वेगळे पाडण्यासाठी आपली लॉबिंग सुरू केली असून त्याला यवतमाळातूनही भक्कम साथ मिळत असल्याचे सांगितले जाते.पांढरकवडा वन विभागाला के. अभर्णा यांच्या रुपाने थेट आयएफएस असलेल्या अधिकारी सलग लाभल्या आहेत. त्यांची यापूर्वीची सेवा आसाममधील देशातील सर्वात मोठ्या काझीरंगा अभयारण्यात झाली आहे. त्या तुलनेत पांढरकवड्यातील आव्हान त्यांच्यापुढे अगदीच छोटे आहे. के. अभर्णा यांनी ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या पध्दतीने पांढरकवडा वन विभागातही कामाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे वन अधिकाऱ्यांच्या परंपरागत भ्रष्टाचाराला ब्रेक लागला आहे. दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या शिकारी, सागवानाची अवैध वृक्षतोड या सारख्या गैरप्रकारांना चाप बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी आता आपला वेगळा गट बनवून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पाच वर्षांपासून पांढरकवड्यात तळवन प्रशासनाची दिशाभूल करून पोलिसांना जंगल फिरविणारा एक वनअधिकारी गेल्या चार-पाच वर्षांपासून पांढरकवड्यात तळ ठोकून आहे. पुढील दोन महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. काँग्रेसच्या एका दिवंगत नेत्याशी असलेल्या नातेसंबंधाच्या बळावर या अधिकाऱ्याने गेल्या वर्षी पांढरकवड्यात मुदतवाढ मिळविली होती. आताही सत्ताधारी भाजपाच्या आर्णी व राळेगावातील आमदारांची मर्जी सांभाळून सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सेवेत राहण्याचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगितले जाते.

नुकसानभरपाई धनादेश विलंबानेवाघाने हल्ला केल्याच्या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईचे धनादेश तातडीने देण्याचे आदेश आयएफएस अभर्णा यांनी दिले होते. मात्र वेगवेगळी कारणे पुढे करून तब्बल दीड महिना विलंबाने हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. त्याचे श्रेय आमदारांना मिळावे म्हणून धनादेश वाटपाचा हा कार्यक्रम कालपर्यंत लांबणीवर टाकला गेला. एरव्ही वाघाने हल्ला करूनही मृताच्या घरी भेटी देण्याची फारशी तसदी न घेणारे वरिष्ठसुद्धा गुरुवारी झालेल्या धनादेश वितरण कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. या कार्यक्रमाला आयएफएस अभर्णा मात्र अनुपस्थित होत्या.

बोगस व्हाऊचर, रॉयल्टीला चापके. अभर्णा यांच्या ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या कारभारामुळे पांढरकवडा वन विभागातील भ्रष्टाचार बराच कमी झाला आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतींना, बोगस व्हाऊचरद्वारे पैसे काढण्याच्या प्रकाराला, रॉयल्टी पॅटर्नला चाप लावला आहे. त्यांनी वन खात्याला शिस्त लावली. त्या स्वत:ही दिवसा आणि रात्रीसुद्धा अचानक जंगलात गस्तीसाठी निघतात. त्यामुळे वन खात्यातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची लॉबी अस्वस्थ आहे. या लॉबीने आता आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यातून ‘आयएफएस’ला वेगळे पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे वन वर्तुळात बोलले जाते. या प्रयत्नांना यवतमाळातूनसुद्धा भक्कम साथ मिळत असल्याचीही चर्चा आहे.

वाघाच्या हल्ल्याचा सूक्ष्म अभ्यासके. अभर्णा यांच्या अभ्यासपूर्ण व सूक्ष्म निरीक्षणाचा अनुभव वाघांच्या हल्ल्याच्या घटनेतून आला. पांढरकवडा विभागात वाघाने शिकार केल्याच्या आठ घटना घडल्या आहेत. त्यातील दोन घटना या के.अभर्णा उपवनसंरक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर घडल्या आहेत. या दोनही घटनांमध्ये त्यांनी मृताच्या अंगावर वाघाचे पडलेले केस, लाळ याचे नमुने घेऊन बंगलोर व हैदराबादला तपासणीसाठी पाठविले. त्या आधारे नेमक्या कोणत्या वाघाने शिकार केली, हे शोधण्यात आले. अशा पद्धतीने यापूर्वी अनेक हल्ले होऊनही कधीच सूक्ष्म तपासणीचा प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही. एवढे हल्ले होऊनही यापुर्वी वाघाला पकडण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न केले गेले नव्हते.

घातपाताचा टर्न अन् पोलीस जंगलातइकडे पाठोपाठ हल्ले होत असल्याने संबंधित एका वन अधिकाऱ्यावर बदली, निलंबन यासारखी कठोर कारवाई होऊ घातली होती. म्हणूनच की काय त्यापासून वन प्रशासनाचे लक्ष विचलित करण्यासाठी एका प्रकरणात वाघाने शिकार केलेली असताना घातपात भासविण्याचा प्रयत्न वनअधिकाऱ्यांकडून झाला. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची एन्ट्री झाली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील संपूर्ण जंगल छानून काढले. मात्र तो घातपात नव्हे, तर वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यातील मृत्यूच असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला.

टॅग्स :Governmentसरकारforest departmentवनविभाग