शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नरकात जायचं नसेल तर कट्टर हिंदुत्त्वादी नेत्यांना निवडून द्या; कालीचरण पुन्हा बरळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2023 20:18 IST

जिल्ह्यातील पुसद शहरात आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला आहे.

यवतमाळ  - महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर चर्चेत आलेल्या कालिचरण महाराजांच्या नेतृत्वात आज यवतमाळमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये आज हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. कालिचरण महाराजांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. यावेळी, बोलताना कट्टर हिंदुत्त्ववादी नेत्यांनाच निवडून देण्याचं आवाहन कालीचरण यांनी केलं. आपल्या भाषणात पुन्हा एकदा त्यांनी धार्मिक मुद्द्यावरुन आक्रमपणा दाखवला. तसेच, भाषावाद आणि जातीवाद खल्लास झाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. 

जिल्ह्यातील पुसद शहरात आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या रोखण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला कालीचरण यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद खल्लास झाला पाहिजे, अन्यथा धर्म खल्लास होईल. धर्म खल्लास झाल्यास 12 हजार वर्षांसाठी तुम्ही नरकात जाणार, असेही कालीचरण यांनी म्हटले. धर्माच रक्षण करणं गरजेच आहे. नरकात जायचे नसेल तर वोटर बँक बनून कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांना निवडून देण्याचे आवाहनही कालीचरण यांनी यावेळी केले. यापूर्वीही कालीचरण यांनी वादग्रस्त विधानं करुन सर्वाचं लक्ष वेधलं होतं. हरीद्वार येथील धर्म संसदेत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भात विधान करताना नथुराम गोडसेचं समर्थन केलं होतं.

दरम्यान, पुसद येथील शिवाजी चौक परिसरातून हा मोर्चा निघाला. आमदार निलेश नाईक यांनीही मोर्चात सहभाग नोंदवला. श्रीराम चंद्राच्या कृपेने सकल हिंदु समाजाने हा मोर्चा काढल्याची प्रतिक्रिया निलेश नाईक यांनी दिली. गोवंश हत्या बंदी, लव्ह जिहाद तसेच धर्मांतराच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरलो, असल्याचं निलेश नाईक यांनी म्हटलं.

टॅग्स :YavatmalयवतमाळHinduहिंदूHindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समिती