शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नप्रसंगात शुटींगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

देशाच्या सीमेवर आतंकी घटना घडल्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. ड्रोनचा वापर करताना आता प्रत्येकांनाच खबरदारी घेण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमात ड्रोन वापरताना प्रथमत: त्याच्याकडे लायसन्स आहे का आणि त्याने परवानगी घेतली आहे का, याबाबतही जातीने चाैकशी होणार आहे. यामुळे पुढील काळात ड्रोन वापरताना पोलीस विभागाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक कार्यक्रमात ड्राेन वापरण्यासाठी परवानगीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लग्न समारंभ, सण, उत्सव, यात्रा याशिवाय मोठ्या सभा अशा ठिकाणी ड्रोनचा हमखास वापर होतो. अनेकवेळा तर आंदोलन करतानाही ड्रोनचा उपयोग करण्यात येतो. देशाच्या सीमेवर आतंकी घटना घडल्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. ड्रोनचा वापर करताना आता प्रत्येकांनाच खबरदारी घेण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमात ड्रोन वापरताना प्रथमत: त्याच्याकडे लायसन्स आहे का आणि त्याने परवानगी घेतली आहे का, याबाबतही जातीने चाैकशी होणार आहे. यामुळे पुढील काळात ड्रोन वापरताना पोलीस विभागाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ड्रोन उडवण्यासाठी लायसन हवे !

ड्रोन उडविण्यासाठी अलीकडे काही कठोर नियम करण्यात आले आहे.सार्वजनिक ठिकाणी वापर करताना ड्रोन उडविण्याचे लायसन्स सक्तीचे आहे.पोलीस प्रशासन या संपूर्ण बाबीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पार पाडते.

सार्वजनिक कार्यक्रमात ड्रोनला परवानगी आवश्यकअलीकडे छायाचित्रणामध्ये ड्रोनचा वापर वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेताना ड्रोनला पोलीस विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. पोलीस प्रशासन संपूर्ण बाबीची खबरदारी घेऊन परवानगी देते.- माधुरी बाविस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी

निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये अथवा सभांमध्ये ड्रोन वापरला जातो. या मदतीने गर्दी कॅच करण्यात येते.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोनला पोलीस विभागाकडून परवानगी घ्यावी लागते.

अशा ड्राेनधारकांना ड्रोनच्या मदतीने चित्रिकरण करताना सार्वजनिक स्थळी प्रथमत: पोलीस विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

ड्रोन उडविण्यासाठी लायसन्सचीही आवश्यकता असते. यानंतरच अधिकृत ड्रोनधारक ड्रोनने फोटो काढू शकतात.

जिल्ह्यामध्ये हाैशी ड्रोनधारकांची संख्या मोठी आहे. मात्र, त्याची नोंद पोलीस दप्तरी निरंक आहे. 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलीस विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. याशिवाय दंडात्मक कारवाईही होते.

- साधारणत: एका कार्यक्रमात फोटो शूट करण्यासाठी कमीत कमी सहा हजार रुपये आकारले जातात.- कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाची भव्यता यावर ड्रोनच्या दराची निश्चिती होते.- कार्यक्रम मोठा असेल, सार्वजनिक स्वरूपाचा असेल तर २० हजारापर्यंतही खर्च जातो.

 

टॅग्स :Policeपोलिस