शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

तर देशाची प्रगती कोणी रोखू शकणार नाही

By admin | Updated: April 8, 2017 00:13 IST

संस्कारांना कृतीत उतरविले की संस्कृती बनते. आपल्या सकारात्मक संस्कृतीतून देशातील प्रत्येक नागरिक एका परिवारासारखे

मुज्जफर हुसैन : शंकरराव सरनाईक वाचनालयात चैत्र महोत्सव पुसद : संस्कारांना कृतीत उतरविले की संस्कृती बनते. आपल्या सकारात्मक संस्कृतीतून देशातील प्रत्येक नागरिक एका परिवारासारखे राहिल्यास भारताची प्रगती कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुज्जफर हुसैन यांनी येथे केले. देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने चैत्र महोत्सवाअंतर्गत आयोजित रमेश जयस्वाल स्मृती ‘भारतीय संस्कृती : काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, संस्कार कृतीत येतात तेव्हा संस्कृती बनते. शासनाचे काम, उद्देश व नीती ही त्या देशाची संस्कृती ठरते. अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने काश्मीरबाबत भारत हिताची मांडलेली भूमिका भारताला बळ देणारी आहे. त्यामुळे ट्रम्प संस्कृती भारत सरकारसाठी सकारात्मक झाली. उलट पाकिस्तानसाठी नकारात्मक. सध्याच्या सरकारमुळे जगात भारताची दखल घेतली जात आहे. स्वातंत्र्यानंतर केवळ इंदिरा गांधी व आताचे नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांमुळे भारताची बाह्य ताकद वाढल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान सरकारने अंतर्गत राजकारणात वेळ घालविण्यापेक्षा अर्थव्यवस्थेला सुदृढ करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनालयाचे अध्यक्ष योगेश राजे यांनी मुज्जफर हुसैन यांचा सत्कार केला. परिचय उपाध्यक्ष अनघा गडम यांनी, संचालन मनीष अनंतवार यांनी तर आभार सहसचिव अजय क्षीरसागर यांनी मानले. यावेळी माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, डॉ.उत्तम रुद्रवार, दीपक आसेगावकर, शंतनू रिठे, अश्विन जयस्वाल उपस्थित होते. वाचनालयाचे सचिव चंद्रकांत गजबी, कोषाध्यक्ष रवी देशपांडे, सदस्य आशीष देशमुख, विजय उबाळे, अ‍ॅड.विनोद पाटील, डॉ.उमेश रेवणवार, स्मिता वाळले, सुनीता तगडपल्लेवार, ग्रंथपाल नागेश गांधे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)