शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालक चुकले तर, फाडणार ई-चालान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 22:08 IST

रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा वाहतूक शाखा आजपासून स्मार्ट : जिल्ह्यात आल्या ४३ एम-स्वाईप मशीन

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे.वाहतूक शाखेचा कारभार पारदर्शक व्हावा म्हणून यापूर्वीच काही जिल्ह्यात ‘एक राज्य एक ई-चालान’ प्रणालीद्वारे वाहतूक शाखा स्मार्ट झाल्या होत्या. मात्र यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अंमलबजावणी खोळंबली होती. आता १ मेपासून या दोन जिल्ह्यातही नव्या प्रणालीचा अवलंब होणार आहे. राज्याच्या गृह शाखेने त्यासंदर्भातील पत्र वाहतूक शाखेला पाठविले असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.या प्रणालीसाठी एमस्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. मोबाईलसारखी ही मशिन असणार आहे. त्याला ब्लूटूथने प्रिंटर अटॅच असेल. या पद्धतीमुळे चोरीचे वाहन, चालकाचा परवाना यांची माहितीही तत्काळ मिळणार आहे. दंडाची रक्कम थेट अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेकडे जमा होणार आहे. तेथून ही रक्कम जिल्हा शाखेच्या खात्यात वळती होणार आहे.वाहतुकीला शिस्त लावताना वाहनांवर विविध नियमानुसार दंड आकारला जातो. अनेकदा हा दंड अवास्तव असल्याची ओरड होते. दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की पोलिसाच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी ई-चालान पद्धती वापरली जाणार आहे.फाडलेल्या चालानवर शासकीय नियमानुसार दंडाची रक्कम राहणार आहे. ती रक्कम अपर पोलीस महासंचालकांच्या वाहतूक शाखेला तत्काळ नोंदविली जाणार आहे. त्याचे स्वतंत्र सॉफ्टवेअर आहे. प्रसंगी डेबिट कार्डवरून रक्कम वळती करता येणार आहे. ज्याने दंड भरला, त्याला अधिकृत पावती दिली जाणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होण्यास वावनाही.परवानाधारकाचा तपशिल कळेलया प्रणालीला आरटीओ आणि पोलीस खात्याशी जोडण्यात आले आहे. यामुळे एखादे वाहन पकडले, तर ते वाहन यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात वापरले गेले होते काय, चालकावर गुन्हे आहेत काय, याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.जिल्ह्याकरिता ४३ एमस्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून १ मेपासून ई-चालान फाडले जाणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.- आकाश चव्हाणई-चालान जिल्हा समन्वयक, यवतमाळ

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस