शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

माध्यमांनी बांधिलकी आणि जबाबदारी ओळखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:39 IST

स्वायत्तता उपभोगायची असेल तर माध्यमांनी आपली बांधीलकी आणि जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे रोखठोक मत नितीन केळकर यांनी शनिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘टॉक शो’ या कार्यक्रमात मांडले.

ठळक मुद्देनितीन केळकर : साहित्य संमेलनात माध्यमांच्या स्वायत्ततेवर ‘टॉक शो’

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : स्वायत्तता उपभोगायची असेल तर माध्यमांनी आपली बांधीलकी आणि जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे रोखठोक मत नितीन केळकर यांनी शनिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘टॉक शो’ या कार्यक्रमात मांडले.संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यामुळे ‘टॉक शो’ या कार्यक्रमातील बहुतांश निमंत्रित पाहुण्यांनी बहिष्कार टाकला. ‘माध्यमांची स्वायत्तता : नेमकी कोणाची?’ असा या चर्चासत्राचा विषय होता. त्यासाठी गिरीश कुबेर, नितीन केळकर, ज्ञानेश महाराव, प्रा. जयदेव डोळे हे निमंत्रित होते. पण यापैकी केळकर वगळता सर्वांनी बहिष्कार टाकला. तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून संजय आवटे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही बहिष्कार टाकला.त्यामुळे नितीन केळकर यांच्या सोबतीला ऐनवेळी कवयित्री अपर्णा मोहिले यांना कार्यक्रमात सहभागी करण्यात आले. तर समन्वयकाची जबाबदारी पत्रकार ज्ञानेश्वर मुंदे यांनी पार पाडली. यावेळी नितीन केळकर म्हणाले, ज्यांनी बहिष्कार टाकला ते अवघ्या चार दिवसात व्हीसा मिळवून क्वालालंपूरच्या संमेलनाला कसे जाऊ शकतात? माहिती मिळविणे हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. माध्यमांना विशेषाधिकार हवेत तरी कशाला? जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राज्यघटनेनुसार सर्वच नागरिकांना आहे, तेच माध्यमांनाही आहे. आजचे वार्ताहर, संपादक हे पूर्वी प्रमाणे नाहीत. त्यांच्या हातून माध्यमे सुटत जाऊन मालकांच्या हाती गेली आहेत. अनेक वाहिन्या राजकीय नेत्यांच्या आणि उद्योगपतींच्या हाती आहे. या वाहिन्यांमध्ये कोणाची किती गुंतवणूक याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे. निवडणुकीत पेड न्यूज देणाऱ्यांना स्वायत्तता देऊन उपयोग काय? असा सवालही त्यांनी केला. मात्र आज आलेल्या सोशल मीडियामुळे माध्यमांना स्वायत्तता देण्याची गरजच नाही, ती आहेच. सोशल मीडियामुळे प्रत्येक नागरिकच माध्यमकर्मी झाला आहे. त्यामुळे आजच्या काळात ‘गांधीजींची तीन बंदरे व्हा’ असा सल्ला देण्यात उपयोग नाही. त्यापेक्षा जे समोर आले ते वाचा, ऐका, बघा. फक्त वाचताना रिकाम्या जागाही वाचा. ऐकताना मौनाचाही अर्थ समजून घ्या. बघताना दाखवायचे काय टाळण्यात आले त्याचा शोध घ्या. तेव्हाच माध्यमांची स्वायत्तता सर्वांच्या उपयोगाची होईल. दोन्ही बाजू मांडणे हे माध्यमांचे कर्तव्य आहे, याचेही भान असले पाहिजे.बायको हीच पहिली सेन्सॉरसेन्सॉरमध्ये कामाचा अनुभव असलेल्या कवयित्री अपर्णा मोहिले यांना ऐनवेळी या ‘टॉक शो’मध्ये सहभागी करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी गंभीर वातावरणाला हलके करण्याचा प्रयत्न केला. स्वायत्तता केवळ माध्यमांचीच नव्हेतर प्रत्येक व्यक्तीचीही महत्त्वाची बाब आहे. पण स्वायत्ततेचा गैरवापर होणार नाही, यासाठी सेन्सॉरशिपही गरजेची आहे. त्यादृष्टीने बायको ही प्रत्येक पुरुषाची पहिली सेन्सॉर असते. संस्थेचा विचार केला, तर प्रत्येक संस्थेचे स्वत:चे नियम असतात. शिस्त असते. त्या शिस्तीत वागण्याचे बंधन घातले म्हणजे स्वायत्तता धोक्यात आली, असे म्हणणे चुकीचे आहे. माणसाने अन्यायाच्या मार्गावरून पुढे जावे म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचा गैरवापर होता कामा नये. पण सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध केला जातो. त्यामुळे ती जपून वापरली पाहिजे.