शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

यवतमाळात आयडियाचे नेटवर्क कोलमडले

By admin | Updated: June 29, 2016 02:35 IST

हिमालयात नेटवर्क उपलब्ध असल्याचा जाहिरातींमधून दावा करणाऱ्या आयडिया मोबाईल कंपनीचे यवतमाळ शहर व परिसरातील नेटवर्क पूर्णत: कोलमडले आहे.

२० हजार ग्राहक त्रस्त : फोर-जीचा दावा, टु-जीही सर्व्हिस मिळत नाही, कॉल डिस्कनेक्टचे प्रकार वाढलेयवतमाळ : हिमालयात नेटवर्क उपलब्ध असल्याचा जाहिरातींमधून दावा करणाऱ्या आयडिया मोबाईल कंपनीचे यवतमाळ शहर व परिसरातील नेटवर्क पूर्णत: कोलमडले आहे. फोर-जी सेवेचा डंका आयडियाकडून पिटला जात असला तरी प्रत्यक्षात साधे टु-जीचेही नेटवर्क मिळत नसल्याने हजारो ग्राहक त्रस्त झाले आहे. आयडियाचे नाव ‘एटीएनटी’ असतानापासून ग्राहक या कंपनीशी जुळले आहे. यवतमाळात सुरुवातीला आयडियाचे नेटवर्क चांगले म्हणून मोबाईल ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात आयडियाला पसंती दिली. परंतु आयडियाने आपल्या सेवेकडे आणि विशेषत: नेटवर्ककडे लक्ष दिले नाही. ग्राहकांची संख्या दिवसागणिक शेकडोने वाढत असताना आयडियाने आपले मोबाईल टॉवर वाढविण्याची खबरदारी घेतली नाही. पर्यायाने टॉवर कमी आणि ग्राहक जास्त असा असमतोल निर्माण झाला. त्यातूनच नेटवर्क न मिळणे, इंटरनेटला स्पीड नसणे, एसएमएस न पोहोचणे, समोरासमोर दोन ग्राहक उभे असताना त्यांचा कॉल न लागणे, आऊट आॅफ रेंज दाखविणे, दोन सेकंदात अचानक कॉल डिस्कनेक्ट होणे या सारखे प्रकार वाढले आहे. अलिकडे तर यवतमाळ शहराच्या अगदी मध्यभागीसुद्धा आयडियाचे नेटवर्क मिळेनासे झाले आहे. त्यामुळे दरदिवशी आयडियाच्या स्थानिक केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्रस्त ग्राहक या केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाईलाजाने शिव्या-शाप देऊ लागला आहे. कारण आयडियाचे वरिष्ठ अधिकारी कोण, तक्रार कुणाकडे करायची, त्यांचे मोबाईल नंबर, ई-मेल आयडी याचा कुठेच थांगपत्ता नसतो. वास्तविक याबाबी या केंद्रांमध्ये दर्शनी भागावर लिहिलेल्या असणे अपेक्षित आहे. अनेकदा ग्राहक त्रासून ‘आता आदित्य बिर्लालाच फोन करावा काय’ अशा शब्दात रोष व्यक्त करतात. आयडिया कंपनीचे कोण अधिकारी, कुठे येतात, कुठे जातात याचा कधी पत्ता लागत नाही. त्यांनी स्वत:हून ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही. आयडियाकडे येणाऱ्या तक्रारी मौखिक स्वरूपात असतात. त्या लेखी नसल्याने त्यांची संख्या आयडियाच्या बड्या अधिकाऱ्यांना माहीत नसावी. आयडियाचा सकाळी सेंड केलेला मॅसेज सायंकाळी पोहोचत असल्याचीही उदारहणे आहे. सातत्याने कॉल डिस्कनेक्ट होत असल्याने एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याचे प्रकारही वाढले आहे. घरात, कार्यालयात, मोकळ्या मैदानात एवढेच नव्हे तर आयडियाच्या स्थानिक बिल सुविधा केंद्राजवळसुद्धा कॉल लागत नसल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे. ग्राहकांच्या बिल मिळत नसल्याच्याही प्रचंड तक्रारी आहे. २० हजार ग्राहक असताना अवघ्या दोन हजार ग्राहकांचे बिल तयार केले जाते. प्री-पेड ग्राहकांचे आपसुकच रिचार्ज कमी होणे, पोस्टपेड ग्राहकांना अचानक (मागणी नसताना) नवनवीन सुविधा सुरू होणे, त्याची रक्कम देयकात लागून येणे, त्यातून देयकांचा आकडा फुगणे असे प्रकार सुरू आहे. आयडिया कंपनी सध्या फोर-जी सेवेच्या जाहिरातीत व्यस्त आहे. आपले सीमकार्ड फोर-जी करुन घेण्यासाठी ग्राहकांना आवाहन केले जात आहे. नेटवर्क चांगले मिळेल, सेवा सुधारेल या आशेने ग्राहकही सीमकार्ड फोर-जी करण्यासाठी आयडियाच्या स्थानिक कार्यालयांमध्ये गर्दी करीत आहे. परंतु फोर-जी सीमकार्ड केलेल्या ग्राहकांवर आता रडण्याची वेळ आली आहे. कारण फोर-जी सेवाच येथे सुरू झालेली नाही. त्यामुळे आता धड थ्री-जीही सेवा मिळेनासे झाले आहे. कित्येक ग्राहक तर ‘फोर-जीचे सोडा किमान टु-जीची तरी चांगली सेवा द्या’ अशी विनवणी त्रस्त होऊन आयडियाच्या येथील सेंटरला करताना दिसतात. शेकडो ग्राहकांचा संपर्क आयडियाच्या या जुन्या क्रमांकावर आहे. उद्योग-व्यवसाय व अन्य कामे या क्रमांकाशी जुळलेली असल्याने आता नंबर बदलविणे नुकसानकारक ठरते. म्हणूनच हजारो ग्राहक नाईलाजाने आयडियाशी जुळलेले आहेत. आयडियाचा कुणी वरिष्ठ अधिकारी यवतमाळात तक्रारी ऐकण्यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हजर झाल्यास त्यांच्यापुढे तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)