शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

पांढरकवडा आदिवासी प्रकल्पात ‘आयएएस’ पीओ

By admin | Updated: December 2, 2015 02:36 IST

पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाचे आदेश : दीडशे कोटींचे बजेट, कारभार सुधारण्याचे नवीन प्रकल्प अधिकाऱ्यांपुढे आव्हानयवतमाळ : पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपककुमार मीना असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्याकडून पांढरकवडा येथील उपविभागीय महसूल अधिकारी पदाचीही जबाबदारी राहणार आहे.राज्यातील सात संवेदनशील आदिवासी प्रकल्पांमध्ये थेट ‘आयएएस’ प्रकल्प अधिकारी नेमण्याचे शासनाचे आदेश आहेत. या यादीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी प्रकल्पाचा समावेश आहे. आदिवासी खात्याचे बिग बजेट लक्षात घेता वने, कृषी, वित्त व अन्य विभागातील अधिकारी पीओ म्हणून प्रतिनियुक्तीवर या विभागात येण्यास उत्सुक असतात. अनेकदा त्यासाठी राजकीय स्तरावरून मोर्चेबांधणी केली जाते. कित्येकदा रॉयल्टीचा राजमार्गही स्वीकारला जातो. ही प्रतिनियुक्ती मिळावी म्हणून अधिकारी वर्ष-वर्षभर बदलीच्या ठिकाणी रुजू न होता आजाराचे कारण पुढे करून मंत्रालयात चकरा मारीत असतात. पांढरकवडा येथे अलिकडच्या काळात प्रेरणा देशभ्रतार या थेट ‘आयएएस’ अधिकारी पीओ म्हणून लाभल्या होत्या. त्यांच्या बदलीनंतर हे प्रकल्प कार्यालय थेट ‘आयएएस’च्या प्रतीक्षेत होते. कधी राज्य सेवेतील अधिकारी तर कधी अतिरिक्त प्रभारावर कारभार सुरू होता. अनेक महिन्यानंतर आता पांढरकवडा प्रकल्पाला पुन्हा थेट ‘आयएएस’ अधिकारी दीपककुमार मीना यांच्या रुपाने लाभले आहेत. ते पदभारही स्वीकारणार आहेत. मीना हे परिविक्षाधीन ‘आयएएस’ आहेत. गेली काही दिवस त्यांनी तहसीलदार, एसडीओ, बीडीओ म्हणून सेवा दिली आहे. आता त्यांची नियुक्ती जिल्ह्यातच पांढरकवडा येथील एसडीओ तसेच आदिवासी प्रकल्पात पीओ म्हणून करण्यात आली आहे. यातील एक त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार राहील. पांढरकवडा प्रकल्पांतर्गत आदिवासींच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून ऐकायला मिळते आहे. आता ‘आयएएस’ पीओ आल्याने ही ओरड थांबणार आहेत. दिवाळीची सुटी संपली मात्र अद्यापही विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये परतले नाही. परंतु कागदोपत्री संपूर्ण उपस्थिती दाखवून आहार पुरवठा नोंदविला जातो. एवढेच नव्हे तर प्रकल्प कार्यालयाला आठ विद्यार्थी उपस्थित असताना दररोज ८० विद्यार्थ्यांचा आहार शिजल्याचे कळविले जाते. बहुतांश आदिवासी आश्रमशाळांची हीच स्थिती आहे. खासगी आश्रमशाळांचा कारभार तर आणखीणच गंभीर आहे. हा कारभार सुधारण्याचे आव्हान थेट ‘आयएएस’ असलेल्या दीपककुमार मीना यांच्यापुढे राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)