शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

पोटगीची रक्कम न भरणाऱ्या नवरोबांना कारावास; कुटुंब न्यायालयाचा निकाल

By सुरेंद्र राऊत | Updated: November 19, 2022 17:04 IST

वॉरंट बजावूनही जुमानले नाही, अखेर शिक्षा

यवतमाळ : येथल कौटुंबिक न्यायालयात दोन विवाहितांनी पोटगी मिळण्यासाठी दावा केला. न्यायालयाने त्यांचा दावा मंजूर केला. पोटगीची रक्कम पतींनी तत्काळ भरावी असे निर्देश दिले. मात्र न्यायालयाच्या आदेशाची अवमानना झाली. वॉरंट बजावूनही पोटगीची रक्कम भरली नाही. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष कफरे यांनी दोघांना प्रत्येकी दहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

दोन्ही प्रकरणातील पतींकडे एक लाख रुपयांपेक्षा जास्त पोटगीची रक्कम थकली होती. पोटगीची रक्कम पत्नी व मुलांसाठी आवश्यक आहे. या रकमेतून अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांची पूर्तता केली जाते. पोटगी वसुलीसाठी वॉरंट काढून पतीला पोटगी भरण्यासाठी बंधनकारक केले जाते. परंतु तरीही पोटगी भरली नाही तर अटक वॉरंटची बजावणी करून शिक्षा दिली जाते. कारावासादरम्यान पोटगीची पूर्ण रक्कम भरल्यास त्याला पतीला मुक्त करण्याचा आदेश आहे. मालमत्ता जप्तीच्या मार्गानेही पोटगीची रक्कम वसूल करता येते.

कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणात पतीने जर पोटगी भरली नाही तर पोलिसांमार्फत वॉरंटची बजावणी करून पतीला पोटगी भरण्यासाठी सांगितले जाते. न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे आता पोटगी वसुलीच्या प्रमाणात वाढ होत आहे. परावलंबी पत्नी व मुलांना दिलासा मिळत आहे. पोटगी प्रकरणात आपसी समजुतीने तडजोड करण्याचे प्रमाणही वाढले आहे

टॅग्स :Courtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारDivorceघटस्फोट