शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पुतणीच्या लग्नात द्यायचे होते आंदण... अन् नवरा-बायकोचे पेटले भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 18:24 IST

लग्नसमारंभाच्या आंदणावरून पती-पत्नीत पेटलेले भांडण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

यवतमाळ : नवरा-बायकोच्या संसारात खर्चाच्याबाबतीत दोघांचीही मर्जी महत्त्वाची असते. दोनपैकी एक पारडे जड झाले की वाद पेटतो. हाच प्रकार एका लग्नसमारंभात उद्भवला. नवऱ्याला न विचारता बायकोने आंदण (प्रेझेंट) खरेदीसाठी खर्च केला. त्यातून नवरा-बायकोचे भांडण पेटले आणि बायकोला गंभीर मारहाण करण्यात आली.

घरातून सुरू झालेला आणि पोलीस ठाण्याच्या पायरीपर्यंत पोहोचलेला हा प्रकार बाभूळगाव तालुक्यातील सरूळ गावात रविवारी दुपारी घडला. दिगांबर शंकरराव श्रीरामे (वय ४१) आणि सुरेखा दिगांबर श्रीरामे (३६) अशी या पती-पत्नीची नावे आहेत. झाले असे की, या दाम्पत्याच्या पुतणीचे रविवारी लग्न होते. त्यासाठी पुतणीला चांगले प्रेझेंट देण्याचे नियोजन करण्यात आले.

मात्र, या खरेदीमध्ये दिगांबर श्रीरामे यांची नाराजी झाली. मला न सांगता पुतणीसाठी प्रेझेंट कसे खरेदी केले? त्या प्रेझेंटसाठी पैसे कुठून आणले? या कारणावरून दिगांबर आणि सुरेखा यांच्यात भांडण झाले. दिगांबरने रागाच्या भरात पत्नीला लाकडी राॅप्टरने मारहाण केली. यात सुरेखाच्या डोक्याला मागील बाजूने गंभीर दुखापत झाली. या प्रकरणात सुरेखाने बाभूळगाव पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध मारहाणीची तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी दिगांबर श्रीरामे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. लग्नसमारंभाच्या आंदणावरून पती-पत्नीत पेटलेले भांडण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार