शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'ती' प्रियकरासोबत फरार होणाच्या तयारीत, पतीने दोघांना पकडले अन्..

By सुरेंद्र राऊत | Updated: November 13, 2023 18:04 IST

तलावफैल पंचशीलनगरची घटना : आरोपी पतीला केली अटक

यवतमाळ : येथील पंचशीलनगरमध्ये प्रियकरासह पत्नी पळून जाण्याच्या बेतात होती. त्यांच्या मागावर असलेल्या पतीने दोघांना पकडले. तेथे पतीची प्रियकरासोबत झटापट झाली. यात पतीने धारदार चाकूने वार करून प्रियकराला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दरम्यान घडली.

निखील अविनाश मेश्राम (२५) रा. पंचशीलनगर तलावफैल असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याचे बोरगाव डॅम येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी सूत जुळले. निखील हा कार वॉशिंग सेंटरवर काम करीत होता. विवाहितेच्या पतीला या संबंधाचा संशय आला. तो दोघांवरही पाळत ठेऊन होता. विवाहिता प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत होती. याच दरम्यान पाळतीवर असलेल्या पतीने दोघांनाही पंचशील नगर परिसरात पकडले. तिथे झटापट झाली. यात चवताळलेल्या पतीने निखीलवर चाकूने वार केले. त्याच्या पोटात चाकूचे घाव लागले. यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी कलम ३०७ भादंविनुसार गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली. ही कारवाई ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात अंकुश फेंडर, प्रदीप नाईकवाडे, संतोष व्यास, किरण पघडण, सुनील पैठणे यांनी केली.

शासकीय रुग्णालयातून जीवंत माणसाचा डेथ मेमो

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. कुणाचाच कुणावर वचक नाही. चाकूहल्ल्यात गंभीर जखमी निखील मेश्राम याच्यावर शस्त्रक्रियागृहात उपचार सुरू असताना दुसरीकडे अपघात कक्षातून मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने निखील मेश्रामचा मृत्यू झाल्याचा अहवाल (डेथ मेमो) शहर पोलिस ठाण्यात पाठविला. यामुळे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. निखील मेश्राम जीवंत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे माहीत होताच पुन्हा तो मृत्यू अहवाल बोलविण्यात आला. असा गोंधळ येथे कायम सुरू असतो. याकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. यातून गंभीर घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारYavatmalयवतमाळ