शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

मूर्तीकारांवर उपासमारीचे संकट

By admin | Updated: September 3, 2016 00:35 IST

गणेश उत्सवाचा काळ म्हणजे मूर्तीकारांसाठी सुगीचे दिवस. एका हंगामात वर्षभराची तजविज केली जायची.

‘पीओपी’ मूर्तीला मागणी : दरात २० ते ३० टक्क्यांची वाढ प्रकाश सातघरे  दिग्रस गणेश उत्सवाचा काळ म्हणजे मूर्तीकारांसाठी सुगीचे दिवस. एका हंगामात वर्षभराची तजविज केली जायची. मात्र आलिकडे प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीनी जागा घेतली. कमी वेळात तयार होणाऱ्या, स्वस्त व आकर्षक मूर्ती भक्तांना बाजारात मिळू लागल्या. त्यामुळे स्थानिक मूर्तीकारावर उपासमारीचे वेळ आली आहे. त्यातच माती, रंग आणि मजूरीचे दर वाढ्याने मूर्तीच्या किमतीतही २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.दिग्रस शहरवासीयांचा आवडता सण म्हणजे गणेशउत्सव होय. या सणाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी बाप्पाला महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असलेली माती, रंगांच्या किंमतीत वाढ झाल्याने गणेश मूर्ती महागणार असल्याचे मूर्तीकार सांगत आहेत. मातीच्या एका टॅक्टरला दोन ते तीन हजारांऐवजी यंदा पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहे. रंगाच्या किंमतीतही वीस ते बावीस रुपये पावकिलो मागे वाढ झाली आहे. शहरी भागात मातीच्या मूर्तीला मागणी आहे. मात्र बाहेरचे मूर्तीकार पैशाच्या हव्यासापोटी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तयार करीत आहेत.सदर मूर्ती पहावयास सुंदर वजनाने हलक्या असल्याने ग्राहक त्यांना पसंती देतात. प्लास्टर आॅफ पॅरिसपासून पर्यावरणाला धोका उद्भवतो अशा मूर्तीवर बंदी आणून ग्रामीण व शहरातील मूर्तीकारांना न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील मूर्तीकारांनी केली आहे. दिग्रस तालुक्यात कुंभार मूर्ती कलावंत २० ते २५ आहेत. १२ महिन्यातून दोन महिने मूर्ती तयार करुन उदरनिर्वाह करणे हा त्यांचा पिढ्यानंपिढ्या चाललेला व्यवसाय आहे. मात्र त्यांच्यावर यंदा उपासमारीची वेळ आली आहे.