शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो वाहने वणी पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:20 IST

शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी गुरूवारी येथील वाहतूक विभागाने शहरात अचानक कारवाईची धडक माहीम राबविली खरी; मात्र या कारवाईने दुचाकीधारकांची चांगलीच दाणादाण उडाली.

ठळक मुद्देकारवाईने दाणादाण : टोर्इंग वाहन दाखल, विद्यार्थ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी गुरूवारी येथील वाहतूक विभागाने शहरात अचानक कारवाईची धडक माहीम राबविली खरी; मात्र या कारवाईने दुचाकीधारकांची चांगलीच दाणादाण उडाली. या कारवाईसाठी खास यवतमाळवरून टोइंग वाहन बोलविण्यात आले. याद्वारे शेकडो वाहने उचलून ठाण्यात लावण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांकडून या वाहनधारकांविरुद्ध कारवाई केली जात होती.शहरात वाहतुकीची शिस्त नसल्याने सवईप्रमाणे गुरूवारी नागरिक वाट्टेल त्या ठिकाणी वाहन उभे करून आपापली कामे करीत असताना वाहतूक पोलिसांचा ताफा टोइंग वाहनासह रस्त्यावर उतरला. रस्त्याच्या कडेल जे वाहन दिसेल ते टोइंग वाहनात उचलून ठेवण्याचा धडाका सुरू होताच, नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडाली. सायंकाळपर्यंत वणीच्या वाहतूक शाखेत शेकडो दुचाकी वाहने जमा झाली होती. प्रत्येक दुचाकी धारकाला दंड आकारून नंतर सोडून देण्यात येत होते. वणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयापुढे अगदी रस्त्याच्या कडेला विद्यार्थी दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे या कारवाईत सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला. यापूर्वी वाहतूक विभागाने अनेकदा महाविद्यालय प्रशासनाला पार्कींगबाबत सूचना दिली होती, हे विशेष.आधी ‘धूम’ स्टाईल बाईकस्वारांना आवरावणी शहरातील वाहतूक नेहमीच बेशिस्त असते. यातून अनेकदा अपघातही घडले आहेत. यात आता धूम स्टाईल बाईकस्वारांनी भर घातली आहे. ओठांवर मिसरूडही न फुटलेली कोवळी मुले वणीतील रस्त्यावरून धूम स्टाईल दुचाकी हाकत आहेत. मात्र याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. गुरूवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत असले तरी धूम स्टाईल बाईकस्वारांच्या मुसक्या कोण आवळणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याविरुद्धदेखील तातडीने मोहिम राबवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस