शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानेच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देएकूण रुग्णसंख्या १०८ : पुसदच्या ७१ जणांना महागावमध्ये केले क्वारंटाईन, आठ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरात कोरोनाचे तांडव सुरूच असून शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तीन तर श्ािनवारी पाच अशा आठ रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची शंभरी पार झाली आहे. एकूण बाधितांची संख्या १०८ वर पोहोचली आहे.शहर व लगतच्या परिसरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी २८ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. तरीही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील ७१ जणांना महागाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी २८ जणांचे अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाले. त्यात रहेमतनगर येथील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. तर एकूण बाधितांची संख्या १०८ वर गेली आहे. रुग्णसंख्येत वाढत होत असल्याने नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी केले आहे.प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानेच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. पोलिसांनी आपला दंडूका ताकदीने चालविण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने लॉकडाऊन मोडणाऱ्या नागरिकांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचा वेग वाढविण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात शहर व तालुक्यात समूह संक्रमण होऊन कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शहरी भागात लॉकडाऊन असताना ग्रामीण भागात मात्र संचारबंदीची कोणतेही चिन्ह दिसत नाही.यामुळे भविष्यात ग्रामीण भागालाही कोरोना आपल्या कवेत घेण्याची शक्यता बळावली आहे. परिणामी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.आतापर्यंत गेले सहा बळीएकूण कोरोना रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली असताना त्यातील सहा जणांचे आतापर्यंत बळी गेले आहे. शनिवारी तालुक्यातील चोंढी येथील एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र ३८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तथापि, रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यंत्रणेने केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या