सरकारी तूर खरेदी : १५ केंद्रांवर तपासणी मोहीमलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन लाख क्विंटल तूर खरेदी प्रकरणात दीड हजार शेतकऱ्यांची चौकशी सहकार विभागाने सुरू केली आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणात जिल्ह्यातील १५० व्यापारी चौकशीच्या घेऱ्यात सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठी कारवाई होण्याचे संकेत आहेत.जिल्ह्यात २२ एप्रिलपर्र्यंत दोन लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. प्रत्येक खरेदी केंद्रावर सर्वाधिक तूर विकणाऱ्या १०० शेतकऱ्यांची यादी करून त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांची सहायक निबंधकांच्या क्षेत्रात चौकशी सुरू झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील १५ केंद्रांवर तूर विकणाऱ्या १५० व्यापाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सहकार विभागाने सुरू केली आहे. तफावत आढळल्यास परवाना रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतर धान्याचा हर्रास थांबलातुरीचे मोजमाप रखडल्याने इतर शेतमालाचा हर्रास थांबला आहे. पेरणी तोंडावर आहे. या स्थितीत इतर शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकरी तयार आहे. मात्र हर्रासच होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
तूर विकणारे दीडशे व्यापारी रडारवर
By admin | Updated: May 30, 2017 01:17 IST