शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी बीडीओंसह कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST

सध्या ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या आहे. गटविकास अधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मुख्यालयाला दांडी मारत आहेत. आपल्यासोबतच कर्मचारी व ग्रामसेवकांनाही त्यांनी पूर्णत: मुभा दिल्याचे चित्र दिसत आहे. कार्यालयात उपस्थित असल्यास जनतेत जनजागृती करण्याऐवजी केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी पंचायत समितीचे सर्व दरवाजे बंद करून कुणाशीही संपर्क न साधता जनतेला पंचायत समितीमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. 

ठळक मुद्देकोरोनाकाळात तालुक्यातील जनता वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : कोरोना महामारीत सतत वाढती रुग्णसंख्या व गावागावांत साथरोगामुळे भीतीचे वातावरण निर्माण होऊन अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार संचार करीत आहेत. मात्र, येथील गटविकास अधिकाऱ्यांसह पंचायत समिती कर्मचाऱ्यांना तालुक्याची ॲलर्जी दिसून येत आहे.सध्या ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या आहे. गटविकास अधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मुख्यालयाला दांडी मारत आहेत. आपल्यासोबतच कर्मचारी व ग्रामसेवकांनाही त्यांनी पूर्णत: मुभा दिल्याचे चित्र दिसत आहे. कार्यालयात उपस्थित असल्यास जनतेत जनजागृती करण्याऐवजी केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी पंचायत समितीचे सर्व दरवाजे बंद करून कुणाशीही संपर्क न साधता जनतेला पंचायत समितीमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. कोरोनामुळे गावागावांत आपत्ती असतानासुद्धा आपत्ती व्यवस्थापन समितीमधील ग्रामसेवक, तलाठी, कृषी साहाय्यक हे सर्व दिसेनासे झाले आहे. ग्रामस्थ त्यांची व्यथा मांडण्यासाठी त्यांचा शोध घेत आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडे गेल्यास पंचायत समितीचे सर्व बाजूंनी दरवाजे बंद केले जातात. मग जनतेने भेटायचे कोणाला?, हा मोठा प्रश्न उभा आहे. पंचायत समितीमध्ये प्रवेश करण्याआधी कोरोना चाचणी करा, असे फलक लावण्यात आले आहे. मात्र, तेथे कोरोना चाचणीची कोणतीही व्यवस्था केली नाही. बाहेरून चाचणी करून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यालाही प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे प्रवेशद्वार बंद ठेवण्याचे कारण काय?, असा प्रश्न आहे. काहींनी लोकप्रतिनिधींना विचारले असता तेही मूग गिळून बसले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा शिरजोरपणा वाढला आहे. लोकप्रतिनिधी आम्हालाही काम करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे सांगून जनतेची बोळवण करीत आहे. 

घरकूल, राेहयोची कामे रखडलीगटविकास अधिकारी रुजू झाल्यापासून अपवादात्मक ग्रामपंचायतींना भेटी दिल्या आहेत. त्यांना ग्रामीण जनतेच्या कोणत्याही समस्येची अथवा कोरोना महामारीवर प्रतिबंध घालण्याशी काहीच देणे-घेणे नसल्याचे यावरून दिसून येते. शिवाय गावस्तरावर रोजगार हमी याेजनेची कामे रखडली आहे. ग्रामीण जनतेला रोजगार नाही. घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते अडकून पडले आहे. बीडीओ यवतमाळ येथे वास्तव्यास राहत असून शासकीय वाहनाने ये-जा करतात. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Employeeकर्मचारीcorona virusकोरोना वायरस बातम्या