शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

शिक्षणाचा डोलारा कसा पेलणार? शिक्षण खात्यात ३ वर्षांपासून १७ पैकी एकही सहसंचालक नाही

By अविनाश साबापुरे | Updated: June 15, 2024 10:33 IST

Education News: तीन वर्षांपासून शालेय शिक्षण खात्यात १७ पैकी एकही सहसंचालक नाही. त्यामुळे अनेक उपक्रमांवर विपरीत परिणाम होत आहे. नव्या सत्राच्या शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता तरी पदे भरावी, अशी मागणी होत आहे.

- अविनाश साबापुरे 

यवतमाळ : तीन वर्षांपासून शालेय शिक्षण खात्यात १७ पैकी एकही सहसंचालक नाही. त्यामुळे अनेक उपक्रमांवर विपरीत परिणाम होत आहे. नव्या सत्राच्या शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता तरी पदे भरावी, अशी मागणी होत आहे. शिक्षण सचिव, आयुक्त, संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी अशा क्रमाने शिक्षण क्षेत्राचा कारभार चालतो. त्यातील प्रत्येक टप्प्यावरील कामांच्या नियोजनासाठी राज्यस्तरावर शिक्षण सहसंचालक हे पद अतिशय महत्त्वाचे आहे.

आतातरी पदे भरणार का?१७ पदे पदोन्नतीने भरण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रक्रिया सुरू झाली. सहसंचालक म्हणून बढतीसाठी पात्र अधिकाऱ्याऱ्यांची यादी सहा महिन्यांपूर्वी पदोन्नती समितीपुढे ठेवण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाच्या समितीने या यादीला मान्यताही दिली. परंतु, आता संबंधित अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याकडे कानाडोळा होत आहे.

पात्र अधिकारीच मिळत नव्हते !सहसंचालक पदासाठी आवश्यक तीन वर्षे कामगिरीची पात्रता असणारे अधिकारीच मिळत नव्हते. त्यामुळे पदोन्नती प्रक्रियाही रखडली होती, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले. परंतु, आता पात्र अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची फाइल तयार असूनही मंत्रालयात धूळखात पडली आहे.

कामांवर विपरित परिणाम शिक्षण सहसंचालकांकडे शिक्षकांचे शालार्थ आयडी, परीक्षासंदर्भातील कामे, शैक्षणिक योजनांचे आराखडे तयार करण्याची जबाबदारी अशी विविध महत्त्वाची कामे असतात.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारYavatmalयवतमाळ