शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय नोकऱ्यांमध्ये अद्याप टायपिंगची अट कायम कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 09:42 IST

टायपिंग मशीनची जागा संगणकाने घेतलेली असतानाही शासकीय नोकऱ्यांसाठी टायपिंग परीक्षा उत्तीर्णतेची अट कायम कशी असा सवाल ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

ठळक मुद्दे‘मॅट’चा सवाल‘ईएसआयसी’ लिपिकाच्या बडतर्फीला अंतरिम स्थगनादेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टायपिंग मशीनची जागा संगणकाने घेतलेली असतानाही शासकीय नोकऱ्यांसाठी टायपिंग परीक्षा उत्तीर्णतेची अट कायम कशी असा सवाल ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी राज्य सरकारला विचारला आहे.शासकीय कर्मचारी प्रदीप बी. बाल्यापली मुंबईच्या राज्य कामगार विमा योजना कार्यालयात (ईएसआयसी) लॅब असिस्टंट पदावर कार्यरत होते. अनुकंपा तत्वावर त्यांना ही नोकरी मिळाली. ते ६० टक्के अपंग आहेत. दरम्यान त्यांनी आपल्याला लॅब असिस्टंट ऐवजी लिपिक कम टायपिस्ट पदावर नेमणूक द्यावी, अशी मागणी केली. जुन्या पदावरील नियुक्ती रद्द करून लिपिक कम टायपिस्ट या पदावर त्यांना २०१५ मध्ये नेमणूक दिली गेली. त्यासाठी त्यांना दोन वर्षात एमएस-सीआयटी ही संगणकीय परीक्षा आणि मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. तशी अटच नियुक्तीच्यावेळी शासनाने घातली होती. संगणकाचे की-बोर्ड सॉफ्ट राहत असल्याने त्यांनी एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु अपंगत्वामुळे टायपिंग मशीनमध्ये हाताची बोटे फसत असल्याने त्यांना ही परीक्षा उत्तीर्णच करता आली नाही. त्यामुळे लिपिक-टायपिस्ट पदाच्या नोकरीवरुन प्रदीप यांना काढून टाकले आणि शिपाई पदावर नियुक्ती देण्याची तयारी दर्शविली.दरम्यान प्रदीप यांनी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्ट प्रशासकीय न्यायाधीकरण) आपल्या बडतर्फीला आव्हान दिले. त्यात आयुक्त तथा संचालक राज्य कामगार विमा योजना कार्यालय, आयुक्त अपंग कल्याण पुणे, प्रधान सचिव सामाजिक न्याय, प्रधान सचिव आरोग्य विभाग यांना प्रतिवादी बनविण्यात आले.टायपिंगच्या मुद्यावर ‘मॅट’ने सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. टायपिंगबाबत शासनाने २०१३ लाच परिपत्रक जारी केले आहे. टायपिंगची जागा संगणकाने घेतली आहे. असे असताना शासनाच्या नोकरभरतीमध्ये अद्याप टायपिंगची अट कायम कशी असा प्रश्न उपस्थित केला गेला. प्रदीप यांना २०१५ ला नोकरी दिली गेली. तरीही टायपिंगची जुनीच अट कायम ठेवली गेली. अर्थात त्यांच्या नोकरभरतीच्या निकषात जुनाच फॉर्मेट वापरला गेला याकडे न्या. अंबादास जोशी यांनी शासनाचे लक्ष वेधले.

आर्थिक लाभाचेही आदेशही समस्या केवळ प्रदीप बाल्यापली यांचीच नसून २०१३ नंतर नियुक्त्या दिलेल्या अनेकांची असू शकते. त्यामुळे आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना ‘मॅट’ने केल्या. सोबतच प्रदीप यांच्या बडतर्फीला अंतरिम स्थगनादेशही ११ जानेवारी रोजी जारी केला. बडतर्फी काळातील आर्थिक लाभही देण्याच्या सूचना केल्या आहेत. या खटल्यात शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी म्हणून कु.एस.पी. मंचेकर यांनी काम पाहिले.

कायद्यात बदल अपेक्षितशासनाने टायपिंगच्या परीक्षा बंद केल्या, टायपिंग मशीनची खरेदी शासन करीत नाही, कोणत्याच कार्यालयात त्याचा वापरही नाही, टायपिंग मशीन बनविणाऱ्या कंपन्याही बंद झाल्या आहेत, या मशीनची देखभाल-दुरुस्ती करणारेही कुणी मिळत नाही. तरीही सरकारने कायद्यात बदल का केला नाही, तो करणे अपेक्षित आहे, असे न्या. अंबादास जोशी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Governmentसरकार