शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डाॅक्टरला दोन कोटीला फसविणाऱ्या संदेशचे आणखी किती ‘हनी ट्रॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST

सोशल मीडियावर अनन्नया सिंग या नावाने फेसबुक, इन्स्टाग्रामवर बनावट खाते काढले. याच माध्यमातून त्याची डाॅक्टरशी ओळख झाली. सुरुवातीला हाय, हॅलो झाल्यानंतर डाॅक्टरशी जवळीकता निर्माण करून संदेशने आपण मोठे उद्योगपती असल्याचे भासविले. डाॅक्टरही भावनिक झाले होते. ते दररोज अनन्नया सिंग अर्थात संदेशशी व्हाॅट्सॲपवरूनही गप्पा मारत होते. एकेदिवशी संदेशने बहिणीच्या अपहरणाचा बनाव करून डाॅक्टरकडे तब्बल दोन कोटींची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्ली येथील एका नामांकित डाॅक्टरला महिला असल्याचे भासवून हनी ट्रॅपमध्ये अडकवित दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या संदेशचे अवघे बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. मात्र, इंग्रजी माध्यमात शिकलेला असल्याने डाॅक्टरांशी तो प्रभावीपणे संवाद साधू शकला. या संदेश मानकरने अशा पद्धतीच्या हनी ट्रॅपमध्ये आणखी किती जणांना फसविले आहे, याचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे. यवतमाळ शहरातील अरुणोदय सोसायटीतील २१ वर्षीय संदेश अनिल मानकर या तरुणाने महिला असल्याचे भासवून दिल्ली येथील डाॅक्टरला तब्बल दोन कोटींचा गंडा घातला. इंग्रजी माध्यमातून इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संदेशच्या वडिलांचे निधन झालेले आहे, तर आई वेगळी राहत असल्याने अरुणोदय सोसायटीत एका भाड्याच्या घरात संदेश राहत आहे. येथूनच त्याने सोशल मीडियावर अनन्नया सिंग या नावाने फेसबुक, इन्स्टाग्रामवर बनावट खाते काढले. याच माध्यमातून त्याची डाॅक्टरशी ओळख झाली. सुरुवातीला हाय, हॅलो झाल्यानंतर डाॅक्टरशी जवळीकता निर्माण करून संदेशने आपण मोठे उद्योगपती असल्याचे भासविले. डाॅक्टरही भावनिक झाले होते. ते दररोज अनन्नया सिंग अर्थात संदेशशी व्हाॅट्सॲपवरूनही गप्पा मारत होते. एकेदिवशी संदेशने बहिणीच्या अपहरणाचा बनाव करून डाॅक्टरकडे तब्बल दोन कोटींची मागणी केली. विशेष म्हणजे, थेट दिल्लीहून यवतमाळमध्ये येत डाॅक्टरांनी शहरातील एकविरा हाॅटेलबाहेर रात्री १० च्या सुमारास अनन्नया सिंग यांनी सांगितल्यानुसार समर नामक तरुणाकडे पैसे सुपूर्द केले. आता हा समर म्हणजे कोण, असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित झाला आहे. समर म्हणजेच संदेश तर नव्हे ना, की संदेशबरोबर आणखी कोणी साथीदार या प्रकरणात आहे, याचाही शोध आता सुरू केला आहे. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ तपासाबद्दल ५० हजारांचे बक्षीस पोलीस पथकाला जाहीर केले आहे. 

कोण बोलत होते महिलेच्या आवाजात ?

- संदेशने महिला असल्याचे भासवून डाॅक्टरांना कोट्यवधींना गंडविले. डाॅक्टरांशी मोबाईलवर महिलेच्या आवाजात बोलणारा संदेश होता की आणखी कोणी महिला या प्रकरणात आहे, याचा शोधही सुरू आहे. दोन कोटीला फसविणाऱ्या संदेशने अनेकांना गंडविल्याचा संशय आहे. 

 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपPoliceपोलिस