शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

मोक्काच्या ११ आरोपींची घरझडती

By admin | Updated: November 22, 2014 23:08 IST

गंभीर गुन्हे शिरावर असलेल्या येथील गुन्हेगारी वर्तुळातील १४ सक्रीय सदस्यांवर ‘मोक्का’ची (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई करण्यात आली. २४ नोव्हेंबरपर्यंत त्यातील ११ आरोपी

यवतमाळ : गंभीर गुन्हे शिरावर असलेल्या येथील गुन्हेगारी वर्तुळातील १४ सक्रीय सदस्यांवर ‘मोक्का’ची (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई करण्यात आली. २४ नोव्हेंबरपर्यंत त्यातील ११ आरोपी पोलीस कोठडी आहेत. यादरम्यान पोलिसांनी संबंधित आरोपींच्या घराची झडती घेतली. अशोक नारायण येसने, नीलेश भानुदास कोयरे, सागर नारायण भुते, आकाश अरूण धनाडे, बजरंग भीमराव सोळंके, आनंद उर्फ गोलु शंकर पारधी, सतीश चंद्रशेखर चौधरी, तुलसी रामाजी बघमारे, आरीफ शाह शफीक शाह, मनीष रामदुलारी यादव, अक्षय अनिल गुंजाळ अशी घरझडती झालेल्या मोक्कातील आरोपींची नावेत आहेत. शहराच्या गुन्हेगारी वर्तुळात सक्रीय असलेल्या या टोळी सदस्यांच्या शिरावर अपहरण, खून, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमरावती परीक्षेत्राचे तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक बिपिन बिहारी यांच्या आदेशाने १४ जणांच्या मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला. आता पोलीस एक-एक पुरावा गोळा करीत आहे. एसडीपीओ भालचंद्र महाजन हे या प्रकरणाचे तपास अधिकारी असून, त्यांच्या नेतृत्वातील पथकाने या ११ ही आरोपींच्या घराची झडती घेतली. मात्र झडतीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे सांगण्यात आले. २४ नोव्हेंबरला या आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना अमरावती येथील विशेष मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्या कोठडी वाढ व्हावी म्हणून पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पुरावेही गोळा करण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)