शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवख्या सशस्त्र तरुणांचा तासभर धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:35 IST

गेली काही महिने काहीसे शांत असलेल्या गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ते पाहता लगतच्या भविष्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अशाच टोळीशी कनेक्ट असलेल्या १८ ते २० वर्ष वयाच्या १५ ते २० नवख्या सशस्त्र तरुणांनी बुधवारी सायंकाळी साई मंदिर-बाजोरियानगर भागात एक ते दीड तास हातात शस्त्रे घेऊन धुमाकूळ घातला.

ठळक मुद्देतिघांवर हल्ला : तलवारी, कोयत्यांचा वापर, अवधूतवाडी पोलीस ठाणे अस्तित्वात आहे का ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेली काही महिने काहीसे शांत असलेल्या गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ते पाहता लगतच्या भविष्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अशाच टोळीशी कनेक्ट असलेल्या १८ ते २० वर्ष वयाच्या १५ ते २० नवख्या सशस्त्र तरुणांनी बुधवारी सायंकाळी साई मंदिर-बाजोरियानगर भागात एक ते दीड तास हातात शस्त्रे घेऊन धुमाकूळ घातला. दोन ते तीन जणांवर जीवघेणा हल्ला केला. हा थरार सुरू असताना अवधूतवाडी पोलिसांचे अस्तित्व कुठेही जाणवले नाही. या थरारामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये मात्र दहशतीचे वातावरण आहे.अवधूतवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जामनकरनगर, आठवडी बाजार, तारपुरा, डेहणकर ले-आऊट, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, शनिमंदिर चौक या भागात या टोळक्यांचा हैदोस बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास सुरू होता. १५ ते २० सदस्य हाती तलवारी, कोयते, लोखंडी पाईप, काठ्या घेऊन एक ते दीड तास धुमाकूळ घालत असताना अवधूतवाडी पोलिसांना मात्र याची खबरबात नव्हती. ते पाहता अवधूतवाडी पोलीस ठाणे अस्तित्वात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.बुधवारी सकाळी अमन पांडे रा. डेहणकर ले-आऊट भोसा रोड या तरुणाला सकाळी १० वाजता रोहण इंगळे, पवन काकडे, आकाश हेमणे यांनी घरी जाऊन आपसी वादातून मारहाण केली. या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. दरम्यान आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, असे कैफियत घेऊन रोहण हा वडिलांसह बुधवारी दुपारीच अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र पोलिसांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. त्याला परत पाठविण्यात आले.लोहारा येथेही दोन गटांत झडपसंघटित गुन्हेगारी व टोळीयुद्धासाठी ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ शहरात पुन्हा गुन्हेगारी डोकेवर काढताना दिसत आहे. बुधवारचा धुमाकूळ ताजा आहे. त्याच्या दोनच दिवसापूर्वी लोहारातही दोन गटांत झडप झाली. या प्रकरणात ३०७ ऐवजी ३२६ चे कलम लावून तीव्रता दडपण्यात आली. त्यात अद्याप कुणालाही अटक झाली नाही.कोयत्याने मुंडके उडविण्याचा होता डाव, हातावर निभावलेअखेर सायंकाळी ७.३० वाजता १५ ते २० युवकांच्या टोळक्याने हाती तलवारी, कोयते घेऊन रोहणचा शोध सुरू केला. बेसावध असलेला रोहण त्यांच्या हाती लागला. त्यांनी रोहणवर प्राणघातक हल्ला केला. त्याला चाकूने भोसकण्यात आले. कोयत्याने त्याची मुंडके उडविण्याचा प्लॅन होता. त्या दृष्टीने हल्लाही केला गेला. मात्र हात आडवा केल्याने मुंडके वाचले. रोहणच्या हाताला जबर दुखापत झाली. या प्रकरणी तातू मुराब, सोनू मुद्दसर, मिया ठाकूर, अमन पांडे, तेजस ढोंगे व इतर सहा ते सात जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, दंगा, शस्त्र बाळगणे आदी कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. रोहणने आरडाओरड केली नसती आणि गर्दी जमली नसती तर कदाचित खुनासारखी गंभीर घटना घडली असती.घरफोड्या वाढल्याअवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मारहाणीसोबतच मालमत्तेचे गुन्हे प्रचंड वाढले आहे. दरदिवशी कुठे ना कुठे मंगळसूत्र चोरी, घरफोडी या सारखे गुन्हे घडत आहेत. या वाढत्या घटना अवधूतवाडी पोलीस ठाणे व त्यांच्या स्थानिक वरिष्ठांचे अपयश अधोरेखीत करणाºया ठरत आहेत.