शहरं
Join us  
Trending Stories
1
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
2
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
3
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
4
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
5
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
6
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
7
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; आतापर्यंत ११ जण ठार, ३३ जखमी!
8
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
9
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
10
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
11
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
12
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
13
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
14
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
15
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
16
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
17
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
18
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
19
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
20
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ

वसतिगृहाची इमारत जीर्ण

By admin | Updated: August 15, 2015 02:30 IST

आदिवासी मुलींच्या वसतिगृहाची इमारत जीर्ण झाली असून या इमारतीत वास्तव्यास असलेल्या ७५ आदिवासी मुलींचा जीव धोक्यात आला आहे. ...

अविनाश खंदारे  उमरखेड आदिवासी मुलींच्या वसतिगृहाची इमारत जीर्ण झाली असून या इमारतीत वास्तव्यास असलेल्या ७५ आदिवासी मुलींचा जीव धोक्यात आला आहे. या जीर्ण इमारतीत दुर्गंधीही पसरली असून आदिवासी विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकांत प्रचंड रोष दिसत आहे. उमरखेड येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी मुलींसाठी वसतिगृह निर्माण करण्यात आले. त्यावेळी एक इमारत भाड्याने घेऊन त्यात वसतिगृह थाटण्यात आले. परंतु त्या ठिकाणी मुलींना त्रास होत असल्याने व इमारत जीर्ण झाल्याने पुसद मार्गावरील कृष्णानगरीत एका जुन्या इमारतीत नव्याने वसतिगृह सुरू केले. सदर वसतिगृह तीन वर्षांपासून या इमारतीत सुरू आहे. जीर्ण इमारतीची आजपर्यंत कोणतीही डागडुजी करण्यात आली नाही. अशा स्थितीत या ठिकाणी ७५ मुली राहतात. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुलींच्या खोल्यांमध्ये स्लॅबमधून पाणी गळते. इमारतीला तडे गेले आहेत. शौचालयाचीही प्रचंड दुरवस्था झाली असून सहा पैकी काही शौचालय बंद आहे. मुलींच्या तपासणीसाठी डॉक्टर येथे येत नाही. त्यामुळे मुलींना खासगी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात. त्याच प्रमाणे शैक्षणिक साहित्य, रजिस्टर, पुस्तके मिळाले नाही. गत मार्च महिन्यापासून आजपर्यंत या मुलींना निर्वाह भत्ता आणि प्रसाधन भत्ता मिळाला नाही. या संदर्भात मुलींच्या पालकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. जीर्ण झालेल्या इमारतीचा करारनामा ३१ मे २०१५ ला संपलेला आहे. त्यामुळे इमारत मालक या खोल्यांची दुरुस्ती करीत नाही. त्याचा फटका मात्र आदिवासी मुलींना बसत आहे. जीव मुठीत घेऊन या विद्यार्थिनी येथे राहतात. या मुलींच्या प्रश्नांबाबत कोणत्याही सामाजिक संघटनेने आजपर्यंत आवाज उठविला नाही. याबाबत अनेक पालकांनी पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे संपर्क केला. परंतु या वसतिगृहाच्या दयनीय अवस्थेत कोणतीच सुधारणा झाली नाही.