शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी शहरातील ५१ निराधार मातांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

हे मंडळ स्वत: मातांच्या घरी जावून त्यांचे पाय धुवून त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांना साडीचोळी भेट देत होते. परिस्थितीशी कणखरपणे लढणाऱ्या या निराधार मातांनी हा अनपेक्षित गौरवाचा सोहळा पाहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. समाजात आपल्या एकाकी आयुष्याचीही दखल घेणारं कुणीतरी आहे याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तर खऱ्या गौरींचं पूजन आपल्या उपक्रमातून झालं याचा भाव सुरज हेमके व त्याच्या मित्रांना तृप्त करणारा ठरला.

ठळक मुद्देआगळेवेगळे गौरीपूजन : युवकांनी राबविला उपक्रम, साडीचोळी देत केली कृतज्ञता व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : गौरी पूजनानिमित्त घराघरात महालक्ष्मीचे आवाहन केले जाते. तीन दिवसांचा हा सोहळा अतिशय मनोभावे साजरा केला जातो. घरोघरी ना-ना प्रकारचे नैवेद्य व मिष्टान्नाची मेजवाणी गौरी गणपतीला दिली जाते. गौरी पूजनाचा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची संकल्पना घाटंजीतील युवकांनी राबविली. त्यांनी शहरातील ५१ निराधार, अपंग व वयोवृद्ध मातांचा सत्कार केला.स्त्री ही लक्ष्मीचं प्रतीक आहे, असं माणणारी आपली संस्कृती. आईला तर अनन्य साधारण महत्त्व आहे. ती ईश्वराचं प्रती रूप आहे. मातृशक्तीचा जागर म्हणूनच महालक्ष्मीचे पूजन घराघरात केले जाते. प्रत्येक गोष्ट अतिशय काटेकोरपणे पालन करून गौरी मातेची आराधना केली जाते. या पवित्र व श्रद्धेच्या वातावरणात खऱ्याखुऱ्या लक्ष्मीचं पूजन करावे, असा संकल्प सुरज हेमके व त्याच्या मित्रमंडळांनी केला. यासाठी त्यांनी घाटंजी शहरातील दुर्धर परिस्थितीशी लढून आपल्या कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या मातांची निवड केली. यामध्ये निराधार, अपंग, वयोवृद्ध मातांचा समावेश होता. हे मंडळ स्वत: मातांच्या घरी जावून त्यांचे पाय धुवून त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांना साडीचोळी भेट देत होते. परिस्थितीशी कणखरपणे लढणाऱ्या या निराधार मातांनी हा अनपेक्षित गौरवाचा सोहळा पाहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. समाजात आपल्या एकाकी आयुष्याचीही दखल घेणारं कुणीतरी आहे याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तर खऱ्या गौरींचं पूजन आपल्या उपक्रमातून झालं याचा भाव सुरज हेमके व त्याच्या मित्रांना तृप्त करणारा ठरला. हा उपक्रम असाच पुढे कायम ठेवला जाईल, असाही संकल्प त्या युवकांनी बोलून दाखविला.

टॅग्स :social workerसमाजसेवक