शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भीषण! मोबाईल फोडल्याने मुलाने केला बापाचा खून; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:00 IST

मुलगा सतत मोबाईलच्या नादी असतो तो कोणतेच काम करीत नाही हे पाहून संतापलेल्या वडिलाने मुलाचा चार्जिंग असलेला मोबाईल फोडला. यावरून संतापलेल्या मुलाने थेट वडिलावर हल्ला चढवत खाटेच्या ठाव्याने जीव जाईपर्यंत डोक्यात प्रहार केले. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हिवरासंगम येथे घडली.

ठळक मुद्देमहागाव तालुक्यातील घटनाखाटेच्या ठाव्याने केला प्रहारमृतदेह जाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुलगा सतत मोबाईलच्या नादी असतो तो कोणतेच काम करीत नाही हे पाहून संतापलेल्या वडिलाने मुलाचा चार्जिंग असलेला मोबाईल फोडला. यावरून संतापलेल्या मुलाने थेट वडिलावर हल्ला चढवत खाटेच्या ठाव्याने जीव जाईपर्यंत डोक्यात प्रहार केले. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हिवरासंगम येथे घडली.मुलगा १६ वषार्चा असल्याने विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून त्याच्याविरोधात महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विधीसंघर्षग्रस्त बालक हा गावातीलच ट्रकवर क्लिनर म्हणून कामाला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या हाताला काम नव्हते, यावरूनच वडील सतत त्याला काही कामधंदा करीत नाही, मोबाईलवर खेळत राहतो असे टोमणे मारत होते. यातूनच दोघा बापलेकात वाद पेटला. वडिलाने रागाच्या भरात घरात चार्जिंग लावलेला मोबाईल फोडला. हे पाहून मुलाने थेट वडिलाला मारायला सुरुवात केली. हाणामारी करीत असतानाच मुलाच्या हातात खाटेचा ठावा लागला. त्याने त्या ठाव्यानेच वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळून वडिलाचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या काकाला माहीत झाला. त्यांनी तातडीने धाव घेऊन मुलाच्या तावडीतून वडिलाची सुटका केली. तो काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हता, शेवटी विधीसंघर्षग्रस्त बालकाला दोरीने खांबाला बांधून ठेवले. घटनेची माहिती पोलीस पाटील प्रवीण कदम यांना दिली. त्यांनी महागाव ठाणेदारांना या घटनेबाबत सांगितले. महागाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. मुलगा व वडील दोघांनाही दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येत आहे.वडिलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्नमोबाईल फोडल्याचा राग आल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकाने वडिलाला डोक्यावर प्रहार करून गंभीर जखमी केले. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या वडिलाला तुराट्याच्या गंजीवर ठेऊन पेटवून देण्याच्या तयारीत विधीसंघर्षग्रस्त बालक होता. तो मधे पडलेल्या काकालाही जुमानत नव्हता. अखेर त्याला शेजाऱ्यांच्या मदतीने खांबाला बांधून ठेवले. झटापटीत त्याला वेळेवर आगपेटी मिळाली नाही. त्यामुळे वडिलाला अर्धमेल्या अवस्थेत जाळता आले नाही. मात्र डोक्यावर गंभीर जखम झाल्याने वडिलांचा काही क्षणातच मृत्यू झाला.

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यू