शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

जिल्हा परिषदेच्यावतीने कर्तबगार शेतकऱ्यांचा सन्मान

By admin | Updated: July 2, 2016 02:45 IST

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात यवतमाळ ...

कृषी दिन : शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन, जिल्हाभरातील ३३ प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिश्रमाला सलामयवतमाळ : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात यवतमाळ जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील ३३ प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान केला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे होत्या. येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, अर्थ व बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, शिक्षण व आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, समाज कल्याण सभापती लता खांदवे, महिला बालकल्याण सभापती विमल चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी, कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात पंजाबराव देशमुख कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ पाटील यांनी सोयाबीनवरील कीड नियंत्रणाच्या प्रयोगाची तांत्रिक माहिती दिली. उपक्रमशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हाभरातून ३३ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही गौरविण्यात आले. यामध्ये यवतमाळ तालुक्यातील सुभाष भाऊरावजी सरोदे (भारी), संगीता धनराज चिकटे (पिंपरी बु), बाभूळगाव तालुक्यातील नीलेश सोपानराव धवणे (वडगाव), वच्छलाबाई महादेवराव गर्जे (मादनी), राळेगाव तालुक्यातील विलास दादाराव संगेवार (झाडगाव), विकास महिपत भगत (अंतरगाव), घाटंजी तालुक्यातील विजय बापूरावजी परचाके (दहेगाव), सुरेश मोतीराम ठाकरे (इंजाळा), पांढरकवडा तालुक्यातील गजानन तोटावर (खैरगाव), शोभा टेकाम (वांजरी), वणी तालुक्यातील अविनाश पावडे (नवरगाव), सुनीता डाहुले (शिरपूर), मारेगाव तालुक्यातील हनुमान खोके (बोंडबुरांडा), सुनीता हरबडे (बोदाड), झरी जामणी तालुक्यातील सीताराम पिंगे (अडेगाव), बेबीताई चामाटे (मांगली), नेर तालुक्यातील प्रशांत मासाळ (कोलुरा), कांता सुने (नेर), आर्णी तालुक्यातील अतुल देशमुख (परसोडा), संदीप उपाध्ये (माहळुंगी), कळंब तालुक्यातील संजय दरणे (हिवरा दरणे), वर्षाताई हाडके (आष्टी), दारव्हा तालुक्यातील आशिष राऊत (वरुड), आनंद मानकर (पिंपरी बु.), दिग्रस तालुक्यातील रतनलाल जयस्वाल (साखरा), वृषाली दुधे (हरसूल), पुसद तालुक्यातील माधव शिंदे (वरुड), संजय बळी (गाजीपूर), उमरखेड तालुक्यातील नारायण दुद्दलवार (ढाणकी), वसंतराव चव्हाण (तरोडा), महागाव तालुक्यातील गणेश चेलमेलवार (सवना), संध्या पोराजवार (बोरी इजारा), राजेंद्र राठोड (मनोहरनगर) या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे आणि उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी आपल्या भाषणातून जिल्हा परिषदेच्या कृषी विषयक योजनांची माहिती दिली. संकटाच्या काळात शासनाकडून कुठल्या स्वरूपात मदत मिळावी याबाबतही उल्लेख केला. (कार्यालय प्रतिनिधी)वसंतराव नाईक यांना अभिवादन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस दरवर्षी कृषीदिन म्हणून साजरा केला जाता. जिल्ह्यात ठिकठिकाणी वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आवारात वसंतराव नाईक यांच्या पुतळ््याला अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, जिल्हा परिषदेचे सभापती सुभाष ठोकळ, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापुरकर, प्राचार्य शंकरराव सांगळे, डॉ. टी.सी. राठोड उपस्थित होते.