शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उमरखेडमध्ये तांड्यांचे नाईक व कारभाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 22:31 IST

आजही बंजारा समाजाच्या तांड्यांवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नाईक आणि कारभारी दुर्लक्षित आहे. मात्र त्यांच्या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. उमरखेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उमरखेड व महागाव तालुक्यातील ५० तांड्यांचे नाईक व कारभारी यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील पहिलाच कार्यक्रम : वसंतराव नाईक यांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : आजही बंजारा समाजाच्या तांड्यांवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नाईक आणि कारभारी दुर्लक्षित आहे. मात्र त्यांच्या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. उमरखेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उमरखेड व महागाव तालुक्यातील ५० तांड्यांचे नाईक व कारभारी यांचा सत्कार करण्यात आला.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गो.सी. गावंडे महाविद्यालयात जिल्हा अखिल कुणबी समाजातर्फे हा सत्कार सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार अनंतकुमार पाटील होते. यावेळी बंजारा समाजाचे आद्यगुरु पोहरादेवी येथील रामराव महाराज, अ‍ॅड. आशिष देशमुख, अ‍ॅड. हटकर उपस्थित होते. आजकालचे मुख्यमंत्री शासकीय पुजेच्या निमित्ताने विठ्ठलासमोर फोटोसेशन करतात. मात्र शेतकऱ्यांनाच आपले दैवत मानणाऱ्या वसंतराव नाईकांनी आपल्या ११ वर्षाच्या कारकीर्दीत विठ्ठलाच्या चरणी लिन होण्याऐवजी शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी आयुष्य खर्ची घातले, असे प्रतिपादन अनंतकुमार पाटील यांनी केले. वसंतराव नाईकांनी ग्रामीण भागासाठी पाहिलेले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज तांड्यांचे नाईक व कारभारी यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर म्हणाले, तांड्यावरील नाईक आणि कारभारी यांच्या कामाची दखल म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रामराव महाराज यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात पाच नाईक व कारभारी यांना वसंतराव नाईक यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित नाईक व कारभारी यांचा माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, नंदकिशोर अग्रवाल, शिवाजी सवनेकर, वनमालाताई राठोड, नितीन भुतडा, डॉ. विश्वनाथ विणकरे, अ‍ॅड. संतोष जैन, चितांगराव कदम, नारायणदास भट्टड, बाळू पाटील चंद्रे, डॉ. आनंदराव कदम, डॉ.या.मा. राऊत, संभाजी नरवाडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अ‍ॅड. हटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन प्रा.बी.यु. लाभशेटवार, चंद्रकांत ठेंगे यांनी केले. तर आभार सुधीर तंवर यांनी मानले.

टॅग्स :Vasantrao Naikवसंतराव नाईक