चैतन्य कुलकर्णी : आर्णी येथे महिला दिन, तालुका विधी सेवा समितीचा पुढाकारआर्णी : कायदा पुरुष व महिला हा भेद करत नाही. त्यामुळे महिला दिन साजरा करण्याची वेळ यायलाच नको. त्यासाठी आपण तसे वागायला पाहिजे. त्याची सुरूवात स्वत:पासून करायला पाहिजे. प्रत्येकाने ठरविले की महिलांचा अपमानच करणार नाही, प्रत्येक घरात स्त्रीचा आदर झालाच पाहिजे, असे आवाहन न्या. चैतन्य कुलकर्णी यांनी केले. तालुका विधी सेवा समिती, आर्णी प्रेस क्लब, तालुका पत्रकार संघ, नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिन कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आज घराघरात सासू सुणेचे वाद दिसून येतात, हेसुद्धा कुठेतरी थांबायला पाहिजे, यासाठी महिलांनी चिंतन करायला पाहिजे. या कार्यक्रमाला सहन्यायाधीश अलअमुदी, सामाजिक कार्यकर्त्या प्रणया बागुल, अॅड. बोरा, अॅड. प्रमोद चौधरी, अॅड. एम.डी. चव्हाण, अॅड. कल्पना नरवाडे, अॅड. राठोड, ठाणेदार संजय खंदाडे, अॅड. व्यवहारे, अॅड. कल्पना नरवाडे आदींची उपस्थिती होती. इतर मान्यवरांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रेरणादायी काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
प्रत्येक घरातील स्त्रीचा आदर व्हावा
By admin | Updated: March 10, 2017 01:13 IST