७ सप्टेंबरला आयोजन : प्रेरणास्थळ आयोजन समिती व ‘जेडीआयईटी’चा पुढाकारयवतमाळ : प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी विभागाच्यावतीने गोकुळाष्टमीनिमित्त ७ सप्टेंबर रोजी हंडी डेकोरेशन आणि गिफ्ट व्रॅपिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर ही स्पर्धा सायंकाळी ५ वाजता होणार आहे. शाळा महाविद्यालया तील विद्यार्थ्यांना आपले कलाकौशल्य दाखविण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक दिले जाणार आहे. प्रथम नाव नोंदविणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. संस्थेचे सचिव किशोर दर्डा आणि प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयटी विभाग प्रमुख प्रा. अतुल राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. ओंकार चांदोरे (९०९६७४६४३३), हृषीकेश जाधव (९६८९३४२१२०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)
गोकुळाष्टमीनिमित्त हंडी डेकोरेशन व गिफ्ट व्रॅपिंग स्पर्धा
By admin | Updated: August 31, 2015 02:08 IST