शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वणी पोलीस ठाण्याच्या सहायक फौजदारासह होमगार्ड पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

एकूण कोरोना रूग्णांपैकी ४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आता १५ झाली आहे. सोमवारी डी.बी.पथकातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून मंगळवारी वणी पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी, २४ कर्मचारी व १० होमगार्ड यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात एक सहाय्यक फौजदार व एका होमगार्डचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देसंसर्ग वाढतोयं : शास्त्रीनगरातील महिला कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सोमवारी वणी पोलीस ठाण्याच्या डी.बी.पथकातील जमादाराचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी त्याच्या संपर्कातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यांपैकी एक सहाय्यक फौजदार व एका होमगार्डची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तसेच शास्त्रीनगरातील एका महिलेचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता वणीतील कोरोना रूग्णांची संख्या ६६ वर गेली आहे.एकूण कोरोना रूग्णांपैकी ४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आता १५ झाली आहे. सोमवारी डी.बी.पथकातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून मंगळवारी वणी पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी, २४ कर्मचारी व १० होमगार्ड यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात एक सहाय्यक फौजदार व एका होमगार्डचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच शास्त्री नगरातील यापूर्वीच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या तिघांनाही परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या तिघांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार केली जात आहे. सोमवारी ३९ जणांचे नमुने यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत त्याचा अहवाल प्राप्त झाला नव्हता. यासोबतच ५३ जणांच्या रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात आली होती.संपूर्ण डी.बी.पथकाला केले होम क्वॉरंटाईनसोमवारी ज्या जमादाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, त्याच्या संपर्कातील हायरिस्कमध्ये येणाºया डी.बी.पथकातील एका पोलीस अधिकाºयासह सहा कर्मचाऱ्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याPoliceपोलिस