शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी मदतीच्या जीआरची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:53 IST

बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने अधिवेशनात घोषित केलेली मदत मिळणारच नाही, अशा प्रकारचा फसवा जीआर शुक्रवारी निर्गमित करण्यात आला.

ठळक मुद्देसरकारने फसविले : शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती आक्रमक

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने अधिवेशनात घोषित केलेली मदत मिळणारच नाही, अशा प्रकारचा फसवा जीआर शुक्रवारी निर्गमित करण्यात आला. त्यामुळे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी या जीआरची होळी केली.जीआरमधील फसव्या तरतुदींचा समाचार समितीने पत्रकार परिषदेत घेतला. समितीचे निमंत्रक देवानंद पवार म्हणाले, मदतीच्या जीआरमध्ये शासनाने ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी आणि ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसानग्रस्त शेतकरी असा फरक केलेला आहे. शिवाय, प्रत्येक शेतकऱ्याचा विचार न करता महसुली मंडळनिहाय मदतीचा प्रस्ताव आहे. यामुळे गरजू शेतकरी वगळले जाण्याचा गंभीर धोका आहे. त्यातही ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला नाही, त्यांना केवळ ६ हजार ८०० रुपये मिळण्याची शक्यता आहे. तीही केवळ शक्यताच आहे. कारण ज्या मंडळात कापूस पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले, त्या मंडळातील शेतकऱ्यांनाच मदत मिळणार आहे. एखाद्या संपूर्ण मंडळाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान नसेल, परंतु, त्यातील काही गावातील शेतकऱ्यांचे नुकसान अधिक असेल तर त्यांच्याविषयीची जबाबदारी शासनाने झटकली आहे. मुळात बोंडअळीसंदर्भात शासनाची भूमिका नौटंकीची आहे, असा आरोप पवार यांनी केला.या जीआरमुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. शासनाची मदत देण्याची मानसिकताच नाही. जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा कमी आणेवारी निघाल्यावरही अद्याप दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही. तसे झाले असते तर कापसासोबत सोयाबीन व इतर सर्व पिकांसाठी मदत मिळू शकली असती, असे यावेळी सांगण्यात आले. जीआरची होळी करतेवेळी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, अशोक भुतडा, राजेंद्र हेंडवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी