शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या समर्थनार्थ हिवरीचे नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 21:34 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल राऊत यांचा कारभार अतिशय चांगला आहे. मात्र आरोग्य सेविका एस. एस. पवार कारस्थान रचून त्यांच्या तक्रारी करीत आहेत. याबाबीचा संताप व्यक्त करीत सर्वसामान्य गावकरी गुरुवारी रस्त्यावर उतरले होते.

ठळक मुद्देप्राथमिक आरोग्य केंद्र : मात्र आरोग्यसेविकेच्या हकालपट्टीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल राऊत यांचा कारभार अतिशय चांगला आहे. मात्र आरोग्य सेविका एस. एस. पवार कारस्थान रचून त्यांच्या तक्रारी करीत आहेत. याबाबीचा संताप व्यक्त करीत सर्वसामान्य गावकरी गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. डॉक्टर आमच्या गावासाठी गरजेचे असून आरोग्य सेविकेचीच ताबडतोब हकालपट्टी करा, अशी मागणी लावून धरली.आरोग्य सेविका पवार यांचा कार्यकाळ वादाचा ठरला आहे. सुरवातीला ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु येथे नव्यानेच रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल राऊत यांनी आरोग्य सेविकेसह सर्व कर्मचाऱ्यांना नियमित सेवा देण्याचे आदेश दिले. पण आरोग्य सेविकेने, तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या, असे उद्धट उत्तर दिले. त्यामुळे डॉ. राऊत यांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना याची कल्पना दिली. ही आरोग्यसेविका उपचारासाठी गोरगरिबांना पैशाची मागणी करीत असल्याचा ग्रामपंचायतचा ठरावसुद्धा घेण्यात आला आहे. तो जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिला. पण अधिकाºयांनी कोणतेच पाऊल उचलले नाही.त्यामुळे येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत संजय शिंदे पाटील यांना बोलावून व्यथा मांडली. डॉक्टर खूपच चांगले आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता आरोग्य सेविका, लिपिकाला हिवरी येथून हाकला, अशी विनंती केली. दोन दिवसात हकालपट्टी न केल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी दिलीप भगत, पोलीस पाटील दिगांबर शहारे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष वाघाडे, डॉ. विश्वनाथ अलोणे, दीपक धुमाळे, पद्माकर शहारे, विजय शहारे, सुभाष मडावी, अमोल मेहर, अशोक डाके, जीवन मेहर, गौरी विठोबा कोडापे, शशिकला ठोकाडे, मंदा मुनेश्वर, चंदा मेहर, माला भगत, संगीता भगत, लक्ष्मी कुमरे, अलका मानकर, कमला राऊत, गीरजा कुमरे, शेवंता झाडे, चंद्रकला बिलोनकर, सीमा कोडापे, सुशिला मेहर, निर्मला सरोदे, विधाली खंडागळे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष शैलेश अलोणे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपला संताप यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :doctorडॉक्टर