शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
3
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
4
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
5
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
6
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
7
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
8
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
9
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
10
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
11
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
12
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
13
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
14
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
16
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
17
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
18
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
19
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
20
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."

‘हाय वे’ नको, पांदण रस्तेच बरे

By admin | Updated: December 20, 2014 22:47 IST

सुमारे १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठा गाजावाजा करीत नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. तथापि कंत्राटदाराने

नागरिकांचा सूर : राष्ट्रीय महामार्गाची झाली प्रचंड दुर्दशाप्रवीण पिन्नमवार - पांढरकवडासुमारे १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठा गाजावाजा करीत नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. तथापि कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने आता या महामार्गाची अत्यंत दययीय अवस्था झाली. त्यामुळे आता ‘हाय वे’ नको, पांदण रस्तेच बरे म्हणण्याची वेळ आली आहे. केळापूर ते पिंपळखुटी, तसेच हिंगणघाट ते करंजी, या दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग प्रचंड दुरवस्थेत आहे. या महामार्गावरून लाखो प्रवाशांना अक्षरश: मरण यातना सहन करतीच पुढील प्रवास करावा लागत आहे. या महामार्गाच्या काठावरील गावांतील ग्रामस्थांना अनेक आजार, व्याधी जडून यातना सहन कराव्या लागत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेक आंदोलने झाली. शासनाला संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली. मात्र प्रत्येकवेळी पुढील वर्षीपर्यंत रस्ता दुरूस्त होईल, अअशीच तारीख देऊन बोळवण करण्यात आली. हा महामार्ग तयार करणे तर सोडाच, साधा दुरूस्तसुद्धा करण्यात आला नाही. नुकतेच या नादुरूस्त रस्त्याचे काम ३१ मार्च २०१५, तर चौपदरीकरणाचे काम ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक एम.के.जैन यांनी दिली. या महामार्गाचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही ग्वाही दिली. या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात जैन यांनी व्यक्तिश: न्यायालयात उपस्थित राहून अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या २४ डिसेंबरला होणार आहे. एकूणच या महामार्गासाठी ‘तारीख पे तारीख...’चाच अनुभव नागरिकांना येत आहे. चांगले रस्ते उपलब्ध झाल्यास परिसराचा, देशाचा विकास होतो. शेतकऱ्यांना शहराला जोडून बाजारपेठेची सुविधा उपलब्ध होते. वेळेची बचत होऊन देशाच्या विकासात भर पडते. या उदात्त हेतूने सरकारने देशात रस्ते तयार करण्याकरिता मोहिमच हाती घेतली होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम १० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. मात्र इतकी वर्षे आणि इतका त्रास, हा महामार्ग तयार करण्यासाठी होत असेल, तर महामार्ग नको, आम्हाला सरकारने पांदण रस्तेच तयार करून द्यावेत, असा सूर आता नागरिकांमध्ये उमटत आहे.