शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

राळेगाव येथे  जोरदार अवकाळी पाऊस; वीज पडून गुराखी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:28 IST

या पावसाने ज्वारीचे कणसे काळी पडण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे .  यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात अनेक तालुक्यात ढगाळी वातावरण आहे .दुपारी राळेगाव आणि परिसरात काही ठिकाणी विजेचा कडकडाट व जोरदार पाऊस पडला. राळेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या शेतात ज्वारी, तीळ, टरबूज  या पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसाचा फटका सर्वात जास्त भुईमूंग आणि आंब्याला बसणार आहे .

या पावसाने ज्वारीचे कणसे काळी पडण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे .  यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णता हतबल झाले. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं जीव टांगणीला लागला आहे. खरीप हंगामात पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. त्यात रब्बी  आणि उन्हाळी पिकांवर त्यांची भिस्त होती.  ती  अवकाळी पावसाने व ढगाळ  वातावरणाने हिरावली. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. बदलत्या हवामानाने हवेत गारवा पसरल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु याच हवामानाने संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती सुद्धा आहे .

राळेगाव येथे वीज पडून गुराखी ठार

तालुक्यात गुरुवारी दुपारी अवकाळी वादळी पाऊस झाला. त्यातच अंगावर वीज कोसळल्याने १५ वर्षीय गुराखी युवक मृत्यूमुखी पडला. शेवन शंकर पवार (१५) रा.वडजई असे मृत युवकाचे नाव आहे. तो राळेगाव येथील एचपी जिनिंगच्या मागील बाजूला बकऱ्या चारण्यासाठी गेला असताना दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसातच त्याच्या अंगावर वीज कोसळली. यात त्याचा मृत्यू झाला. महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेतली. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊस