शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

दोन दिवस पुन्हा मुसळधार पाऊस

By admin | Updated: June 20, 2015 00:41 IST

दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने अमरावती जलमय झाली.

१६२.५ मि.मी. पाऊस : नियोजनही पाण्यात अमरावती : दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने अमरावती जलमय झाली. शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. विदर्भात मान्सून दाखल झाल्यापासून ढग, उन्ह व पावसाचा लपंडाव सुरु झाला. दिवसा उन्ह व ढगाळ वातावरणामुळे उकाडा निर्माण होत आहे.मात्र, सायंकाळनंतर पडणाऱ्या धुंवाधार पावसामुळे थोडा दिलासाही मिळत आहे. धुंवाधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने आपत्कालीन विभागाचीही दमछाक होत आहे. दिवसाच्या पावसामुळे घरात शिरलेले पाणी काढण्यास आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिक त्रास जाणवत नाही. मात्र, सायंकाळनंतर होणाऱ्या धुंवाधार पावसामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. शहरातील फरशी स्टॉप, शकंर नगर, दीपनगर, स्टेट बॅक कॉलनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, आदर्शनगर अशा विविध भागांत पावसाच्या पाण्याने कहर केला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने आपत्कालीन कर्मचारी पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहे. अग्निशमन विभागाचे अधीक्षक भरतसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आपत्कालीन कक्षात २२ कर्मचारी कार्यरत आहेत. आपत्कालीन स्थितीसाठी ते सज्ज असून दिवसरात्र धावपळ करीत आहे. आतापर्यंत १६२.५ मि.मी पाऊसपावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडत आहे. दिवस ऊन्ह, ढग व तासभर पाऊस असे वातावरण पाहायला मिळत आहे. दररोज तासभर धुंवाधार पाऊस पडत असल्यामुळे शहर जलमय होत आहे.आतापर्यंत शहरात १६२.४ मिलीमीटर पावसांची नोंद श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाने घेतली आहे. (प्रतिनिधी)२० ते २२ मुसळधारओरिसाच्या किनाऱ्यावर पश्चिम मध्यबंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती आहे. येत्या २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार आहे. गुजरात ते केरळ कमी दाबाची द्रोणीय स्थिती असून उत्तर राजस्थान, छत्तीसगड मार्गे बंगालचा उपसागर कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. अरबी समुद्रात कमी दाब आणि चक्राकार वारे आहेत. या सर्व स्थितीमुळे २० ते २२ जून दरम्यान विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ आणि २३ जून दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.