शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: June 21, 2015 00:08 IST

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील आरोग्य सेवेची वाट लागली आहे. कर्मचाऱ्यांची काम टाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे.

पावसाळ्यात संकट : कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा, ग्रामीण रूग्णालयच आजारीमारेगाव : गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील आरोग्य सेवेची वाट लागली आहे. कर्मचाऱ्यांची काम टाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. केवळ कागदोपत्री आरोग्य योजना राबविल्या जात असल्याचे अहवाल वरिष्ठांना पाठविले जातात. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत आरोग्य यंत्रणेबाबत प्रचंड रोष दिसून येत आहे.सध्या तालुक्यात सर्वात ढेपाळलेला विभाग जर कोणता असेल, तर आरोग्य विभाग आहे. या विभागाचे कर्मचारी अक्षरश: जनतेच्या जिवाशी खेळत आहे. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीवच दिसून येत नाही. या विभागात प्रत्येक कर्मचाऱ्यांत कामचुकारपणा करण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्याची जबाबदारी तालुका आरोग्य विभागाकडे आहे. पावसाळ्यात ग्रामीण आरोग्य बिघडते. साथीचे आजार फोफावतात. मात्र तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात जाऊन जनतेला मार्गदर्शन करते, असे चित्र कधीही पाहायला मिळत नाही. परिचारिका कधी गावात जात नाही. गावांना भेटीही देत नाही. बहुतांश परिचारिका मुख्यालयी राहणे तर सोडाच, त्या इतर तालुक्यातून अप-डाऊन करतात. कोण काय करते, कोणाचा थांगपत्ता कुणाला नाही. तालुक्यात मार्डी, वेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. नवरगाव येथे आयुर्वेदीक रूग्णालय, म्हैसदोडका व पेंढरी येथे फिरते रूग्णालय आहे. इतर ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे. प्रत्येक गावासाठी आरोग्य सेविका आहे. मात्र या कर्मचाऱ्यांचा लाभ जनतेला होताना दिसत नाही. अनेक परीचारिका तर गावात जातच नाही. अंगणवाडी सेविकेशी भ्रमणध्वनीवरून माहिती घेऊन कागदी घोडे नाचवितात. केवळ टीएचओनी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित राहणे, एवढाच त्यांचा उपक्रम सुरू आहे. तालुका आरोग्य अधिकारी अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची हिंमत वाढली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अप-डाऊनचा आजार जडला आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यवतमाळ येथून अप-डाऊन करतात. रात्री कुणी आजारी पडले, तर डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यातून अनुचित घटना घडतात. साध्या-साध्या औषधांचा तुटवडा, ही तर नित्याचीच बाब झाली आहे. तालुका आरोग्य विभागाच्या कारभाराची ही अवस्था असताना येथील ग्रामीण रूग्णालयाचीही वाट लागली आहे. नुकतीच कुंभा-टाकळी येथे वीज कोसळली. रूग्णांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र साध्या सलाईन लावायलासुद्धा तेथे औषधी नव्हत्या. रूग्ण व नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारला, तर डॉक्टरच रूग्णांच्या नातेवाईकांशी हमरी-तुमरीवर उतरले. नागरिकांनी आमदारांच्या कानावर ही गोष्ट घातली. आमदारांनी रूग्णालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे कळते. (शहर प्रतिनिधी)दवाखान्यावर वचक कोणाचा ?येथील ग्रामीण रूग्णालयावर वचक कोणाचा, हा गहन विषय आहे. नुकताच १८ जूनला एका आॅटोचा अपघात घडला. नऊ ते १० प्रवासी जखमी झाले. त्यामुळे रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांसोबत बघ्यांची गर्दी झाली. तेथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सफाई कर्मचाऱ्यांची धावपळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. रूग्णालयात आलेल्या नागरिकांना आणि स्थानिक पत्रकारांना त्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांसमोर ज्या भाषेत हाकलून लावले, त्यावरून ग्रामीण रूग्णालयावर वचक कुणाचा, असा प्रश्न उपस्थितांना पडला.उपकेंद्रातील औषधी जाते कुठे ?प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात अनेक आजारांवरील औषधे रूग्णांना मोफत देण्यासाठी येतात. मात्र गाव पातळीवर जायला कुणीच तयार नसल्याने आणि ही औषधी अशीच पडून राहत असल्याने सर्वसहमतीने ही औषधे खुल्या बाजारात विकली जात असल्याची कुजबुज सुरू आहे. ग्रामीण जनताही या आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्रात जाण्याऐवजी उपस्थित खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात. परिणामी केंद्रातील औषधी तशीच पडून राहाते. त्याचा विनियोग आरोग्य कर्मचारी परस्पर करून टाकतात.