शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या शोधार्थ आरोग्य यंत्रणा घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:03 IST

गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून शेकडो रूग्ण या आजाराने त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने डेंग्यूशी लढण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देबालिकेचा मृत्यू : वणी शहरात डास अळीनाशक औषधांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून शेकडो रूग्ण या आजाराने त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने डेंग्यूशी लढण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. त्याअनुषंगाने आशा वर्कर, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी यांच्या मदतीने शहरातील संवेदनशील भागातील प्रत्येक घरी जाऊन त्याठिकाणी असलेल्या पाण्यात डास अळीनाशक औषध सोडले. असे असले तरी अद्याप डेंग्यूचे समूळ उच्चाटन झाले नाही.दरम्यान, डेंग्यूने वणी शहरात एका १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची बाब उजेडात आली आहे. खुशी राकेश बन्सोड असे डेंग्यूने मृत पावलेल्या बालिकेचे नाव असून ती शहरातील एसपीएम शाळेची विद्यार्थिनी होती. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. वणी शहरातील अनेक डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला घुग्गूस येथील नातलगांकडे ठेवण्यात आले. नातलगांनी तिच्यावर घुग्गूस येथील एका खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिला १४ आॅक्टोबरला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वाटतेच तिचे निधन झाले. वणी शहरातील डेंग्यूची पहिली बळी ती ठरली.डेंग्यूला कारणीभूत ठरणारा डास हा स्वच्छ पाण्यात जन्म घेतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा नागरिकांनी ‘ड्राय डे’ पाळावा, ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी साचून आहे, ते पाणी नष्ट करावे, यातून डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या अनेक वर्षात वणी भागात डेंग्यूची अशी साथ कधीच पसरली नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागातही असे रूग्ण आढळून येत नव्हते. मात्र गेल्या एक महिन्यापासून डेंग्यूच्या रूग्णात सातत्याने वाढ होत असल्याने डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. वणीतील खासगी रूग्णालय तर रूग्णांनी तुडूंब भरलेले आहेत.तपासणी कीटचा पुरवठाच नाहीडेंग्यूचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी कीट अद्यापही वणी ग्रामीण रूग्णालय अथवा कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आली नाही. त्यामुळे रूग्णांना खासगी पॅथालॉजीमध्ये जाऊन रक्ताची तपासणी करावी लागत आहे. नेमका याचाच फायदा पॅथालॉजीधारक घेत असून शासनाने आकारून दिलेल्या दरापेक्षा अवाच्या सवा पैसे घेऊन रूग्णांची लूट करीत आहे. मात्र यावर आरोग्य यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू