शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

एसटी बस, पिकअप वाहनाची समोरासमोर धडक; एक जागीच ठार 

By अविनाश साबापुरे | Updated: May 16, 2023 16:54 IST

Yawatmal News एसटी बस आणि भरधाव बोलेरो पिकअप वाहनाची समोरासमोर जबर टक्कर झाली. या अपघातात पिकअप वाहनचालक जागेवरच ठार झाला.

अविनाश साबापुरे

यवतमाळ : एसटी बस आणि भरधाव बोलेरो पिकअप वाहनाची समोरासमोर जबर टक्कर झाली. या अपघातात पिकअप वाहनचालक जागेवरच ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता कासोळा गावानजीक पिंपळगाव सुतगिरणी परिसरातील वळणावर घडली.

औरंगाबाद-किनवट ही एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल ४०११) पुसदकडून येत होती. त्याचवेळी पिकअप वाहन (क्रमांक एमएच १६ सीडी ०६५२) माहूरकडून वेगात येत होते. या दोन वाहनांमध्ये कासोळा नजीकच्या वळणावर समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पिकअप वाहनचालक जागेवरच ठार झाला आहे. वृत्त लिहिस्तोवर त्याची ओळख पटलेली नव्हती. मात्र तो मालेगावचा रहिवासी असल्याचे समजते. त्याला पुसद उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मृतकाची ओळख पटवणे सुरू आहे. त्याच्याजवळ ओळखीचा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही. दरम्यान या अपघातात पिकअप वाहनाचा चक्काचूर झालेला आहे. तर बसचेही नुकसान झाले आहे. बसचा चालक व काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.

पुसद-माहूर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र वनविभागाच्या हद्दीत रुंदीकरणाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे तेथे पूर्वीप्रमाणे अरुंद रस्ता आहे. येथील वळण रस्ता अतिशय छोटा असून बाजूला झाडी असल्यामुळे वाहन चालकांना समोरून येणारे वाहन जवळ आल्याशिवाय दिसत नाही. अशातच बोलेरो गाडीचा टायर फुटल्याची माहिती मिळाली. यामधूनच हा अपघात झाला असावा, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. अधिक तपास पुसद ग्रामीण पोलीस करत आहे.

टॅग्स :Accidentअपघात