शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

मेहुण्याला वाचवायला गेले अन् 'महाराज' मृत्युमुखी पडले; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 18:36 IST

Yawatmal News मनोरुग्ण मेहुण्याने विहिरीत उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी महाराजांनी विहिरीत उडी मारली. मात्र, त्यांची ही शेवटचीच उडी ठरून त्यांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ  : मनोरुग्ण मेहुण्याने विहिरीत उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी महाराजांनी विहिरीत उडी मारली. मात्र, त्यांची ही शेवटचीच उडी ठरून त्यांचा मृत्यू झाला. (He went to save his sister-in-law and 'Maharaj' died; Incidents in Yavatmal district)

संत रामदास बळीराम महाराज (केवटे), असे मृत महाराजांचे नाव आहे. त्यांना पोहणे येत नसतानाही त्यांनी मेहुण्याला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. मेहुण्याला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र, रामदास महाराज विहिरीतील गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पुसद तालुक्यातील पार्डी येथे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पार्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रामदास बळीराम महाराज (केवटे), रा. पार्डी येथील चिमा देवी संस्थांमध्ये महाराज म्हणून काम करीत होते. तसेच ते पार्डी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा मेहुणा विकास साहेबराव खंदारे, रा. लोहारा (ई) हा त्यांच्याकडे बुधवारी पाहुणा म्हणून आला होता. तो मनोरुग्ण आहे. त्याने अचानक मंदिरालगतच्या खोल विहिरीत उडी घेतली. हे पाहून रामदास महाराज यांनी पोहणे येत नसतानाही विहिरीत उडी मारली. यावेळी अंधार असल्याने त्यांना काढणे अशक्य होते. त्यातच रामदास गाळात अडकल्याने वर येऊ शकले नाही. दरम्यान, आरडाओरडा झाला. गावकरी घटनास्थळी गोळा झाले. त्यांनी रामदासच्या मेहुण्याला बाहेर काढले. नंतर गावकऱ्यांनी गळ टाकून रामदास यांना बाहेर काढले. तोपर्यंत सारे संपले होते. गुरुवारी त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

सामाजिक कार्यात होते अग्रेसर

नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रामदास महाराजांवर काळाने झडप घातली. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन मुले, भाऊ, बहीण असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Deathमृत्यू