शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीत त्यांनी उघड्यावर काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:02 IST

वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली.

ठळक मुद्देरस्त्यासाठी हटविले अतिक्रमण : महिनाभरापूर्वीच बजावल्या होत्या नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली. शेकोट्या पेटवून जागणाऱ्या नागरिकांनी शासकीय धोरणावर प्रचंड रोष नोंदविला. संवेदनाहीन लोकप्रतिनिधींमुळेच उघड्यावर पडल्याची तिखट प्रतिक्रिया या नागरिकांनी नोंदविली.गतवर्षी फेबु्रवारी महिन्यातच धामणगाव रोड ते लोहारा या बायपास मार्गाच्या रुंदीकरण प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. हायब्रीड अ‍ॅन्यूईटी मॉडेलच्या माध्यमातून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने रस्त्यासाठी अतिक्रमण काढण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या होत्या. पावसाळा आणि नंतर दिवाळी आल्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आली. आता प्रत्यक्ष कामकाज करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारपासून ४०० मिटर रस्ता रुंदीकरणावरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली.यावेळी वातावरणाचा कुठलाही विचार केला गेला नाही. गुरूवारपासून संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट पसरली. यानंतरही त्याचा विचार न करता सलग दोन दिवस अतिक्रमण मोहीम राबविली गेली. यातील अनेक कुटुंबीयांना पर्यायी व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे अशा कुटुंबीयांनी कृषी विज्ञान केंद्राच्या जागेवर आश्रय घेतला. त्यावर पाल ठोकून उघड्यावर कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढली. काही कुटुंबीयांनी तर बसस्थानक, लोहारा मंदिर, शहरातील केदारेश्वर मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात धाव घेतली. दोन दिवस थंडीचा सामना केला.अतिक्रमणधारकांना घरकुल देण्याची मागणीशनिवारच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अतिक्रमणधारकांच्या घरकुलाचा मुद्दा खासदार भावना गवळी यांनी उचलून धरला. त्यावर विचार होईल, असे सांगण्यात आले. मात्र ही प्रक्रिया राबवताना प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याची बाब पुढे आली आहे. वर्षभरापासून हा विषय प्रशासनापुढे असतानाही ठोस उपाययोजना झाल्या नाही.रोजगाराचे कटले तुटलेअतिक्रमणधारकांच्या घरावर बुलडोझर चालविताना त्यामध्ये असलेले लोटगाडे मोडले गेले. यामुळे चहा कॅन्टीन, फळ-भाजीविक्रेत्यांचा रोजगारही बुडला. आता घरही नाही अन् रोजगारही नाही, असे दुहेरी संकट नागरिकांना सोसावे लागत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण