गोळा केली रद्दी : कॅन्सरदिनी कोमलसाठी ५५ हजारांची मदतयवतमाळ : प्रेमदिनी रविवारी तरूणाईने उत्सव साजरा केला. मात्र यवतमाळातील तरूणांनी जरा हटके मोहीम राबविली. कॅन्सरग्रस्त कोमलसाठी त्यांनी रद्दी गोळा केली. तसेच व्यसन त्यागण्याची शपथ घेत एक नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला, निमीत्त होते ‘व्हलेंटाईन ड’े चे.बारावीमध्ये ९५ टक्के गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या कोमलला रक्ताच्या कॅन्सरने ग्रासले आहे. बोनमॅरोची शस्त्रक्रीया करण्यासाठी तिला १५ लाख रूपये लागणार आहेत. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने प्रयास सेवांकुरच्या तरूणांनी कोमलसाठी एक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील दत्त चौक, कळंब चौक, आर्णी नाका, दर्डा नगर या ठिकाणी सेवांकुुरच्या माध्यमातून रद्दी गोेळा करण्यात आली. या उपक्रमात अनेक वेगवेगळया संघटना, शाळकरी आणि महाविद्यालयीन तरूणांनी सहभाग नोंदविला होता. या मोहिमेत ३० क्विंटल रद्दी गोळा करण्यात आली. यासोेबतच २५२२२ रूपयांची रोख रक्कम गोेळा करण्यात आली. अशी एकूण ५५ हजार २२२ रूपयाची मदत कोमलसाठी गोळा झाली. यामध्ये महेश पवार, शेखर सरकटे, मनीषा काटे, डॉ. कावलकर, स्नेहल चौधरी, आशिष खडसे, शुभम खोरे, अमित पडलवार, डॉ. पटेल, वैभव पंडीत, पूजा शिंदे, राहुल श्रीरामे, सत्तार अली, मिनल पांडे, पियाली धार्मिक, आकाश चौके, अनिकेत मानकर, गायत्री कुलकर्णी, दिना सुरपान, आकाश परचाके, शुभम अरसोड, गणेश सुरपाम, सुरज नारनवरे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. (शहर वार्ताहर)
‘त्यांनी’ साजरा केला मानवता दिन
By admin | Updated: February 15, 2016 02:45 IST