शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये हागणदारीमुक्त गाव योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी

By admin | Updated: August 7, 2016 01:21 IST

नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या हागणदारीमुक्त गाव योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे.

अनुदानाची ‘वाट’ : घाणयुक्त रस्त्यांमुळे आरोग्याचा प्रश्न नेर : नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या हागणदारीमुक्त गाव योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण, प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला खीळ बसला आहे. दुसरीकडे घाणयुक्त रस्त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर प्रामुख्याने घाणीमुळे दुष्परिणाम होत असल्याची बाब सिद्ध झाली आहे. यासाठीच शासनाने हागणदारीमुक्त गाव योजना हाती घेतली. या अंतर्गत वैयक्तिक लाभाची योजना सुरू करण्यात आली. प्रत्येक गरजवंताला शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया संबंधितांकडून पूर्ण झाल्यानंतर लाभ देण्यात येतो. मात्र अनेकांनी या निधीचा वापर इतरत्र केल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला शौचास जाणाऱ्यांची संख्या पाहता हे स्पष्ट होते. काही लोकांनी जुनेच शौचालय दाखवून अनुदान लाटल्याचे प्रकार घडले आहेत. हागणदारीमुक्त गावाला शासनाकडून दोन लाखांचा पुरस्कार दिला जातो. प्रत्यक्षात संबंधित गाव पुरस्कारासाठी कसे पात्र ठरले, हा प्रश्न उभा राहतो. या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या गावातील रस्ते आजही घाणीने बरबटलेले दिसतात. कागदोपत्री माहितीच्या आधारे हा पुरस्कार काही गावांनी पदरात पाडून घेतला असावा, असे सांगितले जाते. घाणीने बरबटलेल्या रस्त्यांमुळे साथीचे आजार पसरण्याची चिन्हे बळावली आहे. शौचालयासाठी अनुदान घेणारेही शौचास बाहेर जात असल्याचे दिसून येते. एकूणच या योजनेची वाट लागल्याचे चित्र आहे. योजनेसाठी अनुदान देताना संबंधितांनी योग्य ती तपासणी करण्याची गरज आहे. लाभार्थ्याने शौचालयाचे बांधकाम केले आहे की नाही याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नाही. अनुदान देऊन मोकळे होण्यापुरतीच जबाबदारी मानली जाते. यातूनच भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. असा प्रकार लक्षात आल्यानंतरही कुणावर कारवाई होत नाही. अनुदानाचा गैरवापर होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि ग्रामसचिवांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी जगन बन्सोड यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)