शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

मालधक्का व रॅक पॉर्इंट अधांतरीच

By admin | Updated: April 27, 2017 00:32 IST

रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास बाधा आणणारा दगडी कोळशाचा मालधक्का स्टेशन परिसरातून

 नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात : मंत्र्यांचे आश्वासनही हवेत विरले वणी : रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास बाधा आणणारा दगडी कोळशाचा मालधक्का स्टेशन परिसरातून हटविण्यासाठी नागरिक सातत्याने मागणी करीत आहे. तसेच रेल्वेच्या कायर रेल्वे स्टेशनवर रासायनीक खताचा रॅक पॉर्इंट देण्याची मागणीही कृषी साहित्य विक्रेता व शेतकरी करीत आहे. मात्र या दोन्ही समस्या सुटण्याचा कोणताही संकेत दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. वणीचे रेल्वे स्टेशन मानवी वस्तीला लागून आहे. या रेल्वे स्टेशनवरून चार रेल्वे गाड्या धावतात. मात्र या स्टेशनवरून प्रवासासाठी येणारा-जाणारा प्रवासही स्टेशनच्या दैनावस्थेकडे पाहून हे रेल्वे स्टेशन आहे, की कोळाचे आगार असा प्रश्न विचारतात. वणी परिसरात दगडी कोळशाच्या डझनभर खाणी आहेत. या खाणीतून निघणारा कोळसा दररोज रेल्वेने वीज निर्मिती केंद्राना व इतर उद्योगांना पाठविला जातो. खाणीतील कोळसा ट्रकद्वारे रेल्वे स्टेशनजवळ आणून रिचविला जातो. स्टेशनलगतच कोळशाचा मालधक्का बनविण्यात आला आहे. त्यामुळे स्टेशन लगतच कोळशाचे ढिगारे दिसून येतात. या ठिकाणी कोळसा जेसीबीद्वारे रेल्वे वॅगनमध्ये भरला जातो. कोळसा भरताना उडलेली कोळशाची भूकटी परिसरात पसरते. त्यामुळे स्टेशनसह परिसर काळवंडून जातात. स्टेशनवर बसायला स्वच्छ जागा नाही. त्यामुळे नागरिकांना श्वास घेतानाही त्रास होतो. घराच्या छतावर वाळायला टाकलेले कपडे वाळेपर्यंत काळे डाग पडून घाणेरडे होतात. दिवसभर चालणारी जेसीबीची घरघर तर नागरिकांच्या कानठिण्या बसवून टाकत आहे. त्यामुळे मालधक्का येथून हटवावा, अशी मागणी होत आहे. या मागणीवरून केंद्रीय राज्यमंत्री यांनी हा मालधक्का लवकरच येथून हटवणार, असे अश्वासन सतत चार-पाच वर्षापासून देत आहे. मात्र आश्वासनाची पूर्तता अजूनही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच कायर स्टेशनवर रासायनीक खताची रॅक पॉर्इंटही मंजुर झाल्याचे नागरिक व शेतकरी तीन वर्षापासून अहीर यांच्या तोंडून ऐकत आहे. मात्र त्याचीही पूर्तता अजून झाली नाही. मागील वर्षी पिंपळखुटी स्टेशनवर एक रॅक उतरली. मात्र कायर वणीच्या जवळ असूनही कायर स्टेशनला न्याय मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिक दराने खत विकत घ्यावे लागत आहे. वरील दोन्ही समस्या अहीर साहेब केव्हा सोडविणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)